भोर तालुक्यातील १४ गावांचा संपर्क तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:10 AM2021-07-26T04:10:29+5:302021-07-26T04:10:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भोर : तालुक्यातून कोकणात महाडला जाणारा भोर महाड राष्ट्रीय महामार्ग, नीरा देवघर धरणातील रिंगरोड आणि भोर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भोर : तालुक्यातून कोकणात महाडला जाणारा भोर महाड राष्ट्रीय महामार्ग, नीरा देवघर धरणातील रिंगरोड आणि भोर पसुरे धारमंडप या तीनही रस्त्यांवर मोठमोठ्या दरडी पडून येथील मोऱ्या वाहून गेल्या. रस्ते खचले, संरक्षक भिंती पडल्याने सुमारे १०० किलोमीटरचे रस्ते खराब झाले आहे. यामुळे येथील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. परिणामी जवळपास १४ गावांशी संपर्क तुटलेला आहे.
मुसळधार पावसामुळे भोर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. धोकादायक दरडीमुळे भोर महाड रस्ता धोकादायक बनला आहे. पावसामुळे भोर महाड राष्ट्रीय महामार्गावर कोंढरी हिर्डोशी, वारवंड, शिरगाव, उंबार्डे आणि वरंध घाटात २० ते २२ ठिकाणी दरडी पडल्या. चार ठिकाणच्या
मोऱ्या वाहुन गेल्या. पाच ठिकाणी संरक्षक भिंती पडल्या. तर तीन ठिकाणी रस्ता खचला आहे. शिरगाव जवळ मोठी दरड रस्त्यावर आली असून ती फोडण्याचे काम सुरु आहे. यामुळे रस्ता वाहातुकीस बंद झाला आहे. पावसामुळे ४० किलो मीटरचा रस्ता खराब झालेला आहे. निरादेवघर धरणाच्या काठ (रिंगरोड) रस्त्या वरील तीन ठिकाणी संरक्षक भिती पडल्या. चार ठिकाणी पाईप मोऱ्या वाहुन गेल्या. पाच ठिकाणी रस्ता तुटला आहे. पऱ्हर बुद्रुक, कुडली दुर्गाडीसह अनेक ठिकाणी रस्त्यावर दरडी पडल्याने ४० किलोमीटरचा रास्ता खराब झाला आहे. भोर, पसुरे, पांगारी, धारमंडप रस्त्यावरील साळुंगण येथे दोन ठिकाणी दरड कोसळली. राजिवडी, अशिपी, कुंड या ठिकाणी रस्ता खाचला आहे. यामुळे १५ ते २० किलोमीटरचा रस्ता असे एकुण १०० किलोमीटरचे रस्ते खराब झालेले आहेत. त्यामुळे संपुर्ण वाहातुक बंद आहेत. कोकणात महाडला जाणाऱ्या भोर महाड, रिंगरोड आणि भोर पांगारी धारमंडप हे तीनही रस्ते खराब झाल्याने येथील वाहातुक गेल्या आठवड्यापासुन बंद आहे. सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन जेसीबीच्या साह्याने दरडी हटवण्याचे काम सुरु आहे.
चौकट
मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे दरड काढण्याच्या कामात अडचणी येत आहेत. सतत दरडी पडत असल्याने आठवडाभर रस्ता सुरु होईल की नाही, या बाबत शंका व्यक्त केली जात आहे. रस्ता बंद झाल्याने रिंगरोडवरील धानवली, पऱ्हर बु,पऱ्हर खुर्द, गुढे, निवंगण, माझेरी, शिरवली हिमा, कुडली बुद्रुक, कुडली खुर्द, अभेपुरी, दुर्गाडी या गावांचा तर राजिवाडी, कुंड, अशिंपी शिळींब या १४ गावांचा संर्पक तुटलेला आहे. मागिल चार दिवसांपासुन भोर महाड रस्त्यावरील दरडी काढण्याचे काम सुरु आहे. मात्र, या कामात पावसामुळे अडथळे येत आहेत. लवकरच दरडी काढण्याचे काम पुर्ण होऊन रस्ता वाहातुकीस खुला होईल असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय वागज व शाखा अभियंता सदानंद हल्लाळे यांनी सांगितले.
चौकट
भोर महाड रस्त्यासह सर्व तीनही रस्ते बंद असल्याने १४ गावांचा संर्पक तुटलेला आहे. लोकांना अनेक अडचणी
भोर तालुक्यातील भोर महाड रिंगरोड आणि भोर पांगरी धारमंडप हे तीनही रस्ते पावसाने खराब झाल्याने रिंगरोड वरील १० तर भोर पांगरी पसुरे रोडवरील ४ गावांचा भोर शहराशी संर्पक तुटलेला आहे. यामुळे येथील लोकांचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. आरोग्यसेवेसह अनेक सोयी सुविधांपासुन लोकांना वंचित राहावे लागत आहे. लवकरात लवकर रस्त्याची काम करण्याची मागणी होत आहे.
फोटो