पुणे विभागाकडून दिवाळीनिमित्त एसटीच्या १४०० जादा बस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 08:34 PM2019-09-28T20:34:09+5:302019-09-28T20:36:07+5:30
एसटी महामंडळाकडून दरवर्षी प्रवाशांच्या सुविधेसाठी जादा बस सोडण्यात येतात....
पुणे : दिवाळीनिमित्त पुण्यातून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खान्देश व विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाकडून १४०० जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. जादा बस वाकडेवाडी येथील नवीन शिवाजीनगर बसस्थानक व स्वारगेट बसस्थानकातून सोडण्यात येणार आहेत.
एसटी महामंडळाकडून दरवर्षी प्रवाशांच्या सुविधेसाठी जादा बस सोडण्यात येतात. मागील वर्षी १२३६ जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. यावर्षी त्यामध्ये वाढ करण्यात आली असून दि. २२ ते २६ आॅक्टोबर या कालावधीत १४०० गाड्या धावतील. वाकडेवाडी येथील नवीन बसस्थानक तयार करण्याचे काम सुरू आहे. तिथूनच मराठावाडा, विदर्भ, खान्देशमध्ये विविध ठिकाणी बस सोडण्यात येतील. तर स्वारगेट बसस्थानकातून सातारा, सांगली, कोल्हापुर, सोलापुर, मुंबई, ठाणे, बोरीवली, कोकण या भागात जादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
जागा गाड्यांसाठी आगाऊ आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या आरक्षणासाठी ठरठॠफ हा सांकेतीक कोड वापरावा लागेल. आरक्षणाची स्थिती पाहून जादा बसमध्ये वाढ करण्यात येईल. शहरातील बसस्थानकांबरोबरच एसटीच्या अधिकृत खाजगी आरक्षण केंद्रावरूनही आरक्षण करता येणार आहे. जादा बसच्या आरक्षणांचे आॅनलाईन तिकीट महामंडळाचे संकेतस्थळ व मोबाईल अॅपवरूनही तिकीट काढता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी कासगी बसने अवाजवी पैसे देऊन प्रवास करणे टाळावे. त्याऐवजी एसटी बसने नियमित दरात प्रवास करावा, असे आवाहन पुणे विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी केले आहे.
------------
आरक्षणासाठी संकेतस्थळ : www.Zsrtc.gov.
www.Zsrtcors.co