मतदारयादीतील नावांबाबत आक्षेप नोंदवत १४०१ हरकती दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:16 AM2021-03-04T04:16:55+5:302021-03-04T04:16:55+5:30

दाखल करण्यात आलेल्या हरकतींवर निर्णय घेऊन १ मार्चला प्रभागनिहाय मतदारयादी अंतिम करण्याची मुदत वाढवण्यात आली असून, २८ फेबुवारीपर्यंत ज्या ...

1401 objections filed against the names in the electoral roll | मतदारयादीतील नावांबाबत आक्षेप नोंदवत १४०१ हरकती दाखल

मतदारयादीतील नावांबाबत आक्षेप नोंदवत १४०१ हरकती दाखल

Next

दाखल करण्यात आलेल्या हरकतींवर निर्णय घेऊन १ मार्चला प्रभागनिहाय मतदारयादी अंतिम करण्याची मुदत वाढवण्यात आली असून, २८ फेबुवारीपर्यंत ज्या हरकती आणि सूचनांवर १५ मार्चपर्यत निर्णय घेण्याबाबत निवडणूक आयोगाने निर्देश दिले. प्राप्त हरकतीनुसार हरकतदाराबरोबर प्रत्यक्ष जागेवर जाऊन चर्चा करुन तक्रारींचा निपटारा करण्यासाठी ३० बीएलओसह ६ तलाठी आणि ६ पर्यवेक्षक नेमण्यात आले आहे.

राजगुरुनगर नगरपरिषदेच्या १८ प्रभागांतील आलेल्या तक्रारी हरकतींवर येत्या १५ मार्चपर्यंत नेमलेले कर्मचारी संबंधित हरकतदाराने केलेल्या तक्रारीची जागेवर जाऊन शहानिशा करुन शंका निरसन केल्याची खातरजमेसाठी चर्चा करण्यात येणार आहे. ३१ मार्चपर्यंत मतदान केंद्र स्थळासह केंद्रनिहाय मतदारयादी अंतिम केली जाणार असल्याचे माहिती मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांनी सांगितले.

Web Title: 1401 objections filed against the names in the electoral roll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.