निराधार लोकांसाठी दोन महिन्यांचा १४२८.५० कोटींचा निधी वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:10 AM2021-04-24T04:10:05+5:302021-04-24T04:10:05+5:30

पुणे : संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, वृद्धापकाळ वेतन, विधवा निवृत्तिवेतन व दिव्यांग निवृत्तिवेतन या पाच योजनांतील ३५ लाख ...

1428.50 crore fund distribution for destitute people for two months | निराधार लोकांसाठी दोन महिन्यांचा १४२८.५० कोटींचा निधी वितरण

निराधार लोकांसाठी दोन महिन्यांचा १४२८.५० कोटींचा निधी वितरण

Next

पुणे : संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, वृद्धापकाळ वेतन, विधवा निवृत्तिवेतन व दिव्यांग निवृत्तिवेतन या पाच योजनांतील ३५ लाख लाभार्थींना एप्रिल व मे या दोन महिन्यांचे प्रतिमहिना एक हजारप्रमाणे दोन महिन्यांचे अर्थसाह्य देण्यासाठी १४२८.५० कोटी रुपये निधी वितरित केला.

ऑनलाईन प्रणालीद्वारे जिल्हास्तरावर योजनेच्या लाभार्थीच्या संलग्न बँक खात्यांवर ही रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. राज्य शासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करतानाच सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळावा. या हेतूने घोषित केलेल्या विशेष पॅकेजमधून सामाजिक न्याय विभागांतर्गत हा निधी दिला आहे.

कोरोना प्रतिबंधक नियमावली संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या विशेष पॅकेजची घोषणा केली होती. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार या पाच योजनांसाठी आवश्यक निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करून दिला.

निधी वितरण केलेल्यांमध्ये संजय गांधी निराधार योजना (सर्वसाधारण) ३३० कोटी, संजय गांधी निराधार योजना (अनुसूचित जाती) ६० कोटी, संजय गांधी निराधार योजना (अनुसूचित जमाती) ४५ कोटी, श्रावणबाळ योजना (सर्वसाधारण)-६६० कोटी, श्रावणबाळ योजना (अनु. जाती) १२० कोटी, श्रावणबाळ योजना (अनु.जमाती)-९० कोटी, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना -११० कोटी, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना-१२ कोटी आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तिवेतन योजना-१.५० कोटी असे एकूण १४२८.५० कोटी रुपये निधी वितरित केला आहे. पुढील दोन-तीन दिवसांत तातडीने निधी संबंधित लाभार्थींच्या खात्यांवर वर्ग करावा, असे निर्देशही मुंडे यांनी विभागाला दिले आहेत.

Web Title: 1428.50 crore fund distribution for destitute people for two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.