पुणे जिल्ह्यातील लोहगड, घेरेवाडी परिसरात १४४ लागू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 02:24 PM2023-01-07T14:24:11+5:302023-01-07T14:25:01+5:30

लोहगड, घेरेवाडी परिसरात कलम १४४ म्हणजे संचारबंदी लागू...

144 applicable in Lohgad, Gherewadi area of Pune district | पुणे जिल्ह्यातील लोहगड, घेरेवाडी परिसरात १४४ लागू

पुणे जिल्ह्यातील लोहगड, घेरेवाडी परिसरात १४४ लागू

Next

लोणावळा (पुणे) : लोहगड किल्ल्यावर हाजी हजरत उमरशावली बाबा दर्ग्याचा उरुस दि. ६ व ७ जानेवारीला होणार आहे. या उरुससाठी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान हा उरुस होऊ नये, यासाठी बजरंग दल व इतर संघटनांनी प्रखर विरोध आहे. त्यास स्थानिक ग्रामपंचायतींनी पाठिंबा दर्शविला आहे. त्यातून समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर लोहगड, घेरेवाडी परिसरात कलम १४४ म्हणजे संचारबंदी लागू केली आहे.

लोहगडावरील दर्गा व मजारी यांचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नसल्याने न्यायालयाचे आदेशानुसार प्रतापगडावरील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले. त्याप्रमाणे लोहगडावरील अनधिकृत बांधकाम काढावे, ही बांधकामे अधिकृत करण्यासाठी उरूसाचा वापर केला जात आहे. त्यामुळे लोहगडावर उरूस होऊ दिला जाणार नाही, असे या संघटनांनी सांगितले आहे. तसेच यावर्षी कोणत्याही परिस्थितीत हा अनधिकृत उरूस होऊ देणार नाही याप्रसंगी मोठे जनआंदोलन उभारू, असा इशाराही देण्यात आला आहे.

भारतीय पुरातन विभाग पुणे यांनी लोहगडावर दर्ग्याच्या उरुसास परवानगी नाकारली आहे. त्या दरम्यान पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे. त्यामुळे लोहगडावरील दर्ग्याच्या उरूसाच्या दरम्यान हिंदू-मुस्लिम समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात लोहगडाचे परिसरामध्ये येण्याची शक्यता आहे. यातून कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी तात्काळ प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून दि. ५ ते ८ जानेवारीदरम्यान लोहगड व घेरेवाडी या परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश मावळचे उपविभागीय अधिकारी मावळ - मुळशी संदेश शिर्के यांनी दिले आहेत.

Web Title: 144 applicable in Lohgad, Gherewadi area of Pune district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.