१४७० मतदारांनी केला नोटाचा वापर
By admin | Published: February 26, 2017 03:39 AM2017-02-26T03:39:55+5:302017-02-26T03:39:55+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीच मतांच्याबाबतीत अव्वल राहिली आहे. पंचायत समितीत राष्ट्रवादी काँगे्रसला ५७ हजार ४०६ मते मिळाली आहेत.
मंचर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीच मतांच्याबाबतीत अव्वल राहिली आहे. पंचायत समितीत राष्ट्रवादी काँगे्रसला ५७ हजार ४०६ मते मिळाली आहेत. शिवसेनेला ४९ हजार ९५ मते मिळाली. २१२२ मते नोटा झाली आहेत. जिल्हा परिषदेला राष्ट्रवादीला ६० हजार २३ व शिवसेनेला ५० हजार ५३१ मते मिळाली आहेत. १४७० मतदारांनी नोटाचा वापर केला.
जिल्हा परिषदेच्या ५ पैकी ४ जागा मिळवित राष्ट्रवादी
काँगे्रसने दमदार विजय मिळविला. शिवसेनेला एका जागेवर समाधान मानावे लागले. पंचायत समितीत राष्ट्रवादीचे संख्याबळ मागीलपेक्षा कमी झाले आहे. १० पैकी ६ जागा मिळवित राष्ट्रवादीने पंचायत समिती ताब्यात घेतली आहे.
शिवसेनेचे संख्याबळ एकाने वाढून त्यांना ३ जागा मिळाल्या. एक जागा अपक्ष उमेदवाराने जिंकली आहे. या निवडणुकीत अव्वल राहिलेली राष्ट्रवादी मताच्याबाबतीतही अव्वल राहिले आहे.
घोडेगाव पंचायत समिती गणात दोनच उमेदवार होते. येथे सर्वात जास्त ४०५ जणांनी व मंचर पंचायत समिती गणात सर्वात कमी ९६ जणांनी नोटाला मतदान केले. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्या निरगुडसर गावात राष्ट्रवादीने व खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या लांडेवाडी गावात शिवसेनेने सर्वाधिक मताधिक्य मिळविले आहे.
भाजपाचा या निवडणुकीत पुरता धुव्वा उडाला आहे. जिल्हा परिषदेला भाजपाला ७ हजार ३२७ व पंचायत समितीला केवळ ४ हजार १८९ मते मिळाली आहेत.