Pune Corona News: शहरात बुधवारी १४८ जणांची कोरोनावर मात; तर १२९ नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 06:40 PM2021-10-13T18:40:59+5:302021-10-13T18:41:06+5:30
आज विविध तपासणी केंद्रांवर ७ हजार २१४ संशयितांची तपासणी करण्यात आली
पुणे : शहरात बुधवारी १२९ कोरोनाबाधित आढळून आले असून, १४८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ७ हजार २१४ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २.०५ टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरातील सक्रिय रुग्ण संख्या १ हजार २७१ आहे, तर दिवसभरात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ४ जण हे पुण्याबाहेरील आहे. शहरातील आजचा मृत्युदर हा १.८० टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्ण संख्या ही १८१ इतकी असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २२५ इतकी आहे. शहरात आतापर्यंत ३४ लाख ५५ हजार ६०५ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ५ लाख २ हजार ७९५ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत, तर यापैकी ४ लाख ९२ हजार ४६७ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ९ हजार ५७ जणांचा मृत्यू झाला आहे.