जिल्ह्यातील 15 डी.एड.महाविद्यालये बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:14 AM2020-12-30T04:14:25+5:302020-12-30T04:14:25+5:30
शिक्षक होऊन विद्यार्थी घडवावेत, ज्ञान दानाचे काम करावे,अशी इच्छा बाळगून या पूर्वी अनेकांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. मात्र,गेल्या काही वर्षांपासून ...
शिक्षक होऊन विद्यार्थी घडवावेत, ज्ञान दानाचे काम करावे,अशी इच्छा बाळगून या पूर्वी अनेकांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. मात्र,गेल्या काही वर्षांपासून या क्षेत्राकडे जाणा-या विद्यार्थ्यांची संख्या चांगलीच रोडावली आहे. सुमारे पंधरा वर्षापूर्वी डी.एड.अभ्यासक्रमास प्रवेश मिळत नव्हता. राज्यातील 1 हजार 100 डी.एड.महाविद्यालयांची संख्या 2019-20 मध्ये 849 पर्यंत पोहचली. मात्र,यंदा राज्यातील माहविद्यालयांची संख्या 654 वर आली आहे.
---------------------------
राज्य शासनाने गेल्या काही वर्षांपासून वेतनेतर अनुदान बंद केले आहे.त्यामुळे केवळ अनुदानासाठी डी.एड.महाविद्यालये चालवली जात नाहीत.तर प्रयत्न करून आणि मोफत प्रवेश देऊनही विद्यार्थी प्रवेश घेत नसल्याने संस्थाचालकांवर महाविद्यालये बंद करण्याची वेळ आली आहे.
---------------------------------
डी.एड.करून शिक्षक होण्याची मोठी इच्छा होती.मात्र,शिक्षक भरती न होणे आणि अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाच्या प्रलंबित प्रश्नामुळे माझ्यासारख्या अनेक डी.एड.पदवी धारकांनी रोजगार मिळण्याची आशा सोडून दिली आहे.सध्या मी उपजिविकेसाठी हॉटेल व्यावसाय सुरू केला आहे.
- रवींद्र बारस्कर, डी.एड.पदवीधारक
---------------------
शासनाने शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू केल्यास डी.एड.अभ्यासक्रमास प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या निश्चितच वाढेल.यंदा कोरोनामुळे डी.एड.प्रवेशावर परिणाम झाला आहे.नोकरी मिळण्याची शक्यता कमी असल्याने सध्या विद्यार्थ्यांचा या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्याचा कल कमी झाला आहे.
- वीणा खांदोडे, प्राचार्य, भास्करराव कर्वे अध्यापक विद्यालय,पुणे