प्रामाणिक करदात्यांना मिळकतकरात १५ टक्के सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:26 AM2021-02-20T04:26:36+5:302021-02-20T04:26:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लॉकडाऊनच्या काळातही नियमित मिळकतकर भरून महापालिकेला आर्थिक हातभार लावणाऱ्या पुणेकरांना, महापालिकेने सन २०२१-२२ च्या ...

15% income tax relief for honest taxpayers | प्रामाणिक करदात्यांना मिळकतकरात १५ टक्के सवलत

प्रामाणिक करदात्यांना मिळकतकरात १५ टक्के सवलत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : लॉकडाऊनच्या काळातही नियमित मिळकतकर भरून महापालिकेला आर्थिक हातभार लावणाऱ्या पुणेकरांना, महापालिकेने सन २०२१-२२ च्या वर्षासाठी निवासी मिळकतकरात सरसकट १५ टक्के सवलत देऊ केली आहे़ १ एप्रिल, २०२१ ते ११ मे,२०२१ या दोन महिन्यांत मिळकतकर भरणाऱ्यांनाच ही कर सवलत लागू राहणार आहे़

महापालिका आयुक्तांनी आगामी वर्षाकरिता सुचविलेली ११ टक्के मिळकतकर करवाढ फेटाळतानाच, आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांसह सर्व पक्षांनी एकत्र येऊन सर्वसाधारण सभेत उपसूचनेव्दारे निवासी मिळकतकरात सवलत देत पुणेकरांना खूष केले आहे़

पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी आॅनलाईन झाली़ या सभेत स्थायी समितीने सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी कोणतीही करवाढ न करण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवला होता़ हा प्रस्ताव मान्य करतानाच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी थकबाकीदारांसाठी महापालिका अभय योजना राबवित असेल तर, प्रामाणिकपणे मिळकतकर भरणाऱ्या पुणेकरांनाही सवलत देण्याची मागणी केली़ यावर सुमारे पाऊण तास सत्ताधारी, विरोधी पक्ष व प्रशासन यांच्यामध्ये चर्चा झाली़ अखेरीस राज्य शासनाचे चार कर वगळून महापालिका आकारत असलेल्या सर्व साधारण कर, सफाई पट्टी, वृक्ष कर, रस्ता कर, जलनिस्सारण कर, मलनिस्सारण कर, अग्निशमन कर, शिक्षण उपकर आणि विशेष सफाई कर आदी दहा करांमध्ये प्रामाणिकपणे मिळकतकर भरणाऱ्यांना १५ टक्के सवलत देण्याच्यी उपसूचना एकमताने मान्य करून, प्रशासनाची ११ टक्के मिळकतकरवाढ फेटाळत १५ टक्के सवलतीचा निर्णय घेण्यात आला़

--------------------------

चौकट १ :-

सर्वच करात सवलत मिळणार

महापालिकेकडून यापूर्वी नियमित कर भरणाऱ्या निवासी मिळकतकरधारकांना २५ हजारांपर्यंत कर रक्कम असल्यास १० टक्के सवलत, तर २५ हजारांच्या पुढे कर रक्कम असल्यास ५ टक्के सवलत सर्वसाधारण करात देण्यात येत होती़ आता १ एप्रिल,२०२१ पासून ३१ मे,२०२० पर्यंत सन २०२१-२२ चा मिळकतकर भरणाऱ्यांना शासनाचे कर वगळता महापालिकेच्या सर्वच करात रकमेची अट काढून सरसकट १५ टक्के सवलत देण्यात येणार आहे़

----------------------

Web Title: 15% income tax relief for honest taxpayers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.