‘एक्सप्रेस वे’वरील अपघातात १५ जखमी

By admin | Published: November 16, 2015 01:52 AM2015-11-16T01:52:30+5:302015-11-16T01:52:30+5:30

मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटातील अंडा पॉइंट येथे खासगी बस उलटून झालेल्या अपघातात १५ प्रवासी जखमी झाले.

15 injured in accident on Expressway | ‘एक्सप्रेस वे’वरील अपघातात १५ जखमी

‘एक्सप्रेस वे’वरील अपघातात १५ जखमी

Next

लोणावळा : मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटातील अंडा पॉइंट येथे खासगी बस उलटून झालेल्या अपघातात १५ प्रवासी जखमी झाले. जखमीतील ७ जणांची प्रकृती गंभीर आहे. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला.
या अपघातात अनिल दिवालकर (२२, रा. चिपळून), प्रसन्न राजाराम दिवालकर (४५, रा. चिपळून), प्राची माणगावकर (३५, रा. चिंचवड), विद्या विजय निसळ (रा. पिंपरी), सुधा रामचंद्र कांबळे (रा. काळेवाडी), मेहबूब मजहर मुजावर (रा. चिंचवड), रामदास कांबळे (रा. काळेवाडी), अंजली विजय निसळ (रा. पिंपरी) हे गंभीर जखमी झाले आहेत.
बोरघाट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव निघालेली खासगी बस (एमएच १४ सीडब्ल्यू ८३९९) ब्रेक फेल झाल्याने अंडा पॉइंट (किमी ४४) येथील वळणावर पलटी होऊन सरळ झाल्याने हा अपघात झाला.(वार्ताहर)

Web Title: 15 injured in accident on Expressway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.