Pune: परदेशातून परीक्षेचे स्टडी मटेरियल पाठविण्याच्या बहाण्याने १५ लाखांची फसवणूक 

By भाग्यश्री गिलडा | Published: July 19, 2023 04:45 PM2023-07-19T16:45:04+5:302023-07-19T16:49:42+5:30

वानवडी परिसरातील फसवणुकीची घटना...

15 lakh fraud on the pretext of sending exam study material from abroad | Pune: परदेशातून परीक्षेचे स्टडी मटेरियल पाठविण्याच्या बहाण्याने १५ लाखांची फसवणूक 

Pune: परदेशातून परीक्षेचे स्टडी मटेरियल पाठविण्याच्या बहाण्याने १५ लाखांची फसवणूक 

googlenewsNext

पुणे : भारतामध्ये एमआरसीपी परीक्षेच्या अभ्यासक्रमाचे पुस्तक व साहित्य सह्जसहजी मिळत नाही म्हणून परदेशातून पुस्तक मागवणे महिलेला चांगलेच महागात पडले आहे. परदेशातून परीक्षेचे मटेरियल पाठवतो असे सांगून एका महिलेची फसवणूक केल्याची घटना वानवडी परिसरात घडली आहे.

वानवडी परिसरात राहणाऱ्या एका महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, इंग्लंडमधील वैद्यकीय क्षेत्रातील एमआरसीपी परीक्षेची स्टडी मटरेल व परीक्षाचे संभाव्य प्रश्नसंच याबाबत ऑनलाईन पडताळणी केली. त्यावेळी फेसबूकधारक डॉ. विल्यम व सोनिया नांदो यांनी संबंधित परीक्षेचे संभाव्य प्रश्नसंच परीक्षा बोर्डाच्या डेटाबेसमधून मिळवून देतो असे सांगितले. तसेच तज्ज्ञांचा मोबाईल क्रमांक देतो. ते तुम्हाला परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मदत करतील असे सांगितले. त्यासाठी काही रक्कम भरावी लागेल असे सांगून  वेळोवेळी वेगवेगळी कारणे देऊन महिलेची यांची एकूण १४ लाख ९७ हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे पुढील तपास करत आहे.

Web Title: 15 lakh fraud on the pretext of sending exam study material from abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.