शिवसेनेच्या नगरसेवकाकडे मागितली १५ लाखांची खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:15 AM2021-09-15T04:15:38+5:302021-09-15T04:15:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क चाकण : एका महिलेला विनयभंगाची खोटी तक्रार देण्यासाठी चाकण पोलीस ठाण्यात पाठवून, ते प्रकरण मिटविण्यासाठी १५ ...

15 lakh ransom demanded from Shiv Sena corporator | शिवसेनेच्या नगरसेवकाकडे मागितली १५ लाखांची खंडणी

शिवसेनेच्या नगरसेवकाकडे मागितली १५ लाखांची खंडणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

चाकण : एका महिलेला विनयभंगाची खोटी तक्रार देण्यासाठी चाकण पोलीस ठाण्यात पाठवून, ते प्रकरण मिटविण्यासाठी १५ लाखांची मागणी करण्यात आल्याची धक्कादायक घटना चाकणमध्ये उघडकीस आली आहे. शिवसेनेच्या नगरसेवकाने या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार, चाकणचे माजी उपसरपंच, एक पत्रकार आणि मानवाधिकार संघटनेच्या काही महिला अशा एकूण नऊ जणांवर सोमवारी (दि १३) चाकण पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यातील चार जणांना अटक करण्यात आली आहे.

शिवसेनेचे नगरसेवक किशोर ज्ञानोबा शेवकरी (रा.वैशाली कॉम्प्लेक्स, चाकण, ता.खेड) यांनी याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार, चाकणचे माजी उपसरपंच प्रीतम परदेशी, संगीता वानखेडे, कांतीलाल शिंदे, गीतांजली भस्मे, संगीता नाईकरे, मंदा जोगदंड, कुणाल राऊत, प्रणीत नामक एक इसम आणि चाकणमधील पत्रकार कल्पेश अनंतराव भोई अशा ९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामधील चौघांना अटक करण्यात आली आहे.

खंडणीची ही संपूर्ण घटना ४ सप्टेंबर ते १२ सप्टेंबरच्या दरम्यान आंबेठाण चौक चाकण येथील वैशाली कॉम्प्लेक्समध्ये घडली. नगरसेवक शेवकरी यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, वरील सर्व आरोपींनी व इतर सक्रिय टोळीने संगनमताने बदनामी करण्याच्या उद्देशाने सलोनी वैध नामक महिलेस वारंवार चाकण पोलीस ठाण्यात पाठवून, नगरसेवक शेवकरी यांच्या विरोधात विनयभंगाची खोटी तक्रार देण्यास सांगितले होते. दरम्यानच्या काळात हे प्रकरण मिटविण्यासाठी ब्लॅकमेल करून सुरुवातीला १५ लाखांची मागणी केली, नंतर तडजोड करून १२ लाख किंवा ५ लाख रुपये व सलोनी वैध यांच्या वैद्यकीय उपचारासाठी वारंवार पैशांची मागणी केली. पैशांची मागणी करण्याच्या सर्व घटना नगरसेवक शेवकरी यांच्या ऑफिसमध्ये असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या आहेत. त्याचप्रमाणे, पैशांच्या मागणीचे व्हॉट्सॲप चॅटिंगही समोर आले आहे. हे सर्व पुरावे पोलिसांकडे शेवकरी यांनी सुपुर्द केले आहेत. या घटनेने चाकण शहरात एकाच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी मानवाधिकार संघटनेच्या अध्यक्षा संगीता नाईकरे, पत्रकार कल्पेश भोई, गीतांजली भस्मे आणि आणखी एक जण अशा चौघांना अटक करण्यात आली आहे. अन्य आरोपी फरारी आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश राठोड, उपनिरीक्षक विजय जगदाळे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: 15 lakh ransom demanded from Shiv Sena corporator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.