बँकेत खाते उघडून देतो सांगून महिलेला १५ लाखांचा गंडा
By भाग्यश्री गिलडा | Published: November 24, 2023 05:41 PM2023-11-24T17:41:23+5:302023-11-24T17:41:49+5:30
खाजगी माहिती मिळवून आरोपीने महिलेच्या बँक खात्यातून १५ लाख ६५ हजार रुपये काढून घेतले
पुणे : बँकेत खाते उघडून देतो सांगून महिलेला १५ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शनिवार पेठ परिसरात राहणाऱ्या महिलेने पोलिसांना फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार १ फेब्रुवारी २०२२ ते ७ जुलै २०२३ यादरम्यान घडला आहे. फिर्यादीत म्हटल्यानुसार, तक्रारदार महिलेचे सिंहगडरोड परिसरात हॉटेल आहे. आरोपी संतोष लक्ष्मण मोरे (वय - ४६, रा. सिंहगडरोड) हा तक्रारदार महिलेच्या परिचयाचा आहे. महिलेचे इचलकरंजी मधील बँक खाते बंद करून सिंहगडरोडच्या बँकेत खाते उघड असे मोरे याने महिलेला सांगितले. महिलेने होकार देऊन बँक खाते उघडण्यासाठी मोरे याची मदत मागितली. बँकेचा फॉर्म भारत असताना मोरेने त्यामध्ये तक्रारदार महिलेचा मोबाईल नंबर आणि आणि इमेल आयडी न टाकता. स्वतःचा ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक टाकला. त्यानंतर नेटबँकिंगचा वापर करून आयडी आणि पासवर्ड जनरेट केला. खाजगी माहिती मिळवून आरोपीने महिलेच्या बँक खात्यातून १५ लाख ६५ हजार रुपये काढून घेतले. हा प्रकार महिलेच्या लक्षात येताच तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात लक्ष्मण मोरे याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गायकवाड हे करत आहेत.