हॉटेल व्यवसायिकाला मारहाण करून १५ तोळ्यांची चैन चोरली; तिघांना १२ तासांच्या आत अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 01:02 PM2023-09-03T13:02:17+5:302023-09-03T13:02:35+5:30

तीन आरोपी सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्यांच्यावर चोरी, जबरीचोरी, अवैध शस्त्र बाळगणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत

15 tola chain stolen by beating hotelier Three arrested within 12 hours | हॉटेल व्यवसायिकाला मारहाण करून १५ तोळ्यांची चैन चोरली; तिघांना १२ तासांच्या आत अटक

हॉटेल व्यवसायिकाला मारहाण करून १५ तोळ्यांची चैन चोरली; तिघांना १२ तासांच्या आत अटक

googlenewsNext

शेलपिंपळगाव : बहुळ (ता. खेड) हद्दीत हॉटेल व्यावसायिकाला जबर मारहाण करून त्याच्या गळयातील पंधरा तोळे सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या तीन चोरट्यांना चाकण पोलिसांनी बारा तासांच्या आत अटक केली आहे. चोरांकडून सोनसाखळीसह ३ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. श्रीराम संतोष होले (वय २५, रा. होलेवाडी ता. खेड), प्रतिक उर्फ बंटी दत्तात्रय टाकळकर (वय २१, रा. टाकळकरवाडी ता. खेड) व बबलु रमेश टोपे (वय २३, रा. वाकी बु ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सतीश कुंडलीक गव्हाणे (वय ५७, रा. पाटीलवाडी, कोरेगाव भिमा ता. शिरूर) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
         
 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बहुळ गावच्या हददीत चाकण - शिकापुर रोडलगत हॉटेल एस. के. येथे तीन अनोळखी चोरटयांनी मोटार सायकलवर येऊन फिर्यादी व साक्षीदार यांना लाकडी दांडके व पीव्हीसी पाईपने मारहाण केली. तसेच फिर्यादी गव्हाणे यांच्या गळ्यातील पंधरा तोळे वजनाची सोन्याची साखळी जबरीने हिसकावून चोरटे दुचाकीवरून पळून गेले. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच चाकण पोलिसांनी ठिकठिकाणी सापळा लावून तिघांना ताब्यात घेतले.
              
आरोपींकडून सोन्याची साखळी तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली दुचाकी असा तीन लाख सत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान हे आरोपी सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्यांच्यावर चोरी, जबरीचोरी, अवैध शस्त्र बाळगणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. या आरोपींना ५ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. 

Web Title: 15 tola chain stolen by beating hotelier Three arrested within 12 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.