इमारतीच्या छतावरून खाली पडल्याने १५ वर्षीय मुलगी गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 18:27 IST2025-02-07T18:26:42+5:302025-02-07T18:27:23+5:30
तिला लोणी काळभोर येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

इमारतीच्या छतावरून खाली पडल्याने १५ वर्षीय मुलगी गंभीर जखमी
लोणी काळभोर : कदमवाकवस्ती परिसरातील नववीमध्ये शिकत असलेल्या १५ वर्षीय मुलगी इमारतीच्या छतावरून खाली पडून गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि.६) रात्री ११ वाजणाच्या सुमारास घडली आहे.
समृद्धी सतीश ढगे (वय १५, रा. कदमवाकवस्ती ता. हवेली) असे टेरेसवरून पडलेल्या मुलीचे नाव आहे. तिला लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी ही लोणी काळभोर परिसरातील एका नामांकित शाळेत शिक्षण घेत आहे. तर ती इयत्ता नववीच्या वर्गात शिकत आहे. गुरुवारी कुटुंबातील सर्वांनी रात्री नऊ वाजण्याच्या जवळ केले व दहा वाजण्याच्या सुमारास आपापल्या बेडरूम मध्ये झोपण्यासाठी गेले होते.
समृद्धी खाली पडल्यानंतर गंभीर जखमी झाली होती.या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलिस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलिस हवालदार केतन धेंडे व त्यांच्या सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी जखमी समृद्धीला तिच्या नातेवाईकांच्या मदतीने त्वरित लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. समृद्धी वर उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती तेथील डॉक्टरांकडून मिळत आहे. समृध्दीने इमारतीच्या टेरेसवरून कशी पडली ? याचे कारण अद्याप समोर आले नसले तरी त्यादृष्टिकोनातून पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.