सहा हजार निवृत्त कर्मचाऱ्याचे एसटीने थकविले १५० कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:10 AM2021-07-30T04:10:29+5:302021-07-30T04:10:29+5:30
पुणे विभागातील ४०० कर्मचाऱ्यांचा समावेश : कर्मचाऱ्यांचे हाल प्रसाद कानडे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्य परिवहन महामंडळाने ...
पुणे विभागातील ४०० कर्मचाऱ्यांचा समावेश : कर्मचाऱ्यांचे हाल
प्रसाद कानडे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य परिवहन महामंडळाने जवळपास सहा हजार निवृत्त कर्मचाऱ्यांचे १५० कोटी रुपये थकविले आहे. यात रजेचा पगार व वेतनवाढीतला फरक याचा समावेश आहे. गेल्या तीन वर्षांपासून निवृत्त कर्मचारी यासाठी झगडत आहे. मात्र, अद्याप एसटी प्रशासनाने थकीत रक्कम दिलेली नाही. त्यामुळे निवृत्तीनंतर ही कर्मचाऱ्यांचे हाल होत आहे. म्हातारपणाची हक्काची रक्कम मिळता मिळेना.
एसटी कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर त्यांना एक महिन्यात भविष्य निर्वाह निधी व उपदान (ग्रॅच्युटी) दिले जाते. मात्र यासोबतच कर्मचारी निवृत्त होताना त्यांना रजेचा पगार व वेतनवाढीतील फरक हे देणे देखील आवश्यक आहे. मात्र २०१९ पासून एसटी महामंडळाने ही रक्कम थकवली आहे. तो आकडा आता १५० कोटी इतका झाला आहे. सध्या एसटीची आर्थिक स्थिती लक्षात घेता आता किती कर्मचाऱ्यांना ही थकबाकी मिळेल हे पाहावे लागेल.
बॉक्स १
जिल्ह्यात आगार : १३
अधिकारी : ५०
एकूण कर्मचारी : ४५००
बस चालक : १८००
बस वाहक : १६००
बॉक्स २
पुणे विभागातील ४०० कर्मचारी वंचित
पुणे विभागाचे जवळपास ४०० कर्मचारी यापासून वंचित आहे. एसटी महामंडळ जसे उत्पन्न मिळेल तसे कर्मचाऱ्यांचा फरक देऊ अशी भूमिका घेतली आहे. मात्र तोपर्यंत निवृत्त कर्मचाऱ्यांच्या नशिबी वाट पाहणे हेच आहे.
कोट १
एसटी महामंडळाने निवृत्त कर्मचाऱ्याचे देणे तत्काळ द्यावे. १५० कोटी ही रक्कम महामंडळास फार मोठी नाही. कारण एसटीचे बजेट हे ९ हजार कोटीपेक्षा जास्त आहे. प्रवासी वाहतुकीतून मिळणारे उत्पन्न जरी कमी असेल तर एसटीने उत्पन्नाचे अन्य मार्ग शोधावेत.
- श्रीरंग बर्गे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस.
कोट २
पीएफ व ग्रॅच्युटी ही दिलेली आहे. काही कर्मचाऱ्यांचा मात्र रजेचा पगार व अन्य देणी थकली आहे. ती देखील लवकर दिली जातील .
- रमाकांत गायकवाड, विभाग नियंत्रक, एसटी विभाग, पुणे.