बांधकाम व्यावसायिकाकडे १५ हजारांची खंडणी मागणा-याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:11 AM2021-03-20T04:11:33+5:302021-03-20T04:11:33+5:30
पुणे- एका बांधकाम व्यावसायिकाला शस्त्रांचा धाक दाखवून १५ हजारांची खंडणी मागत १० हजार रुपये घेतल्याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी एकाला अटक ...
पुणे- एका बांधकाम व्यावसायिकाला शस्त्रांचा धाक दाखवून १५ हजारांची खंडणी मागत १० हजार रुपये घेतल्याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी एकाला अटक केली. न्यायालयाने त्याला २२ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
फैजल काझी (वय २१) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी आणखी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विक्रम मनेरे (वय ४४) यांनी फिर्याद दिली आहे. १५ फेब्रुवारी रोजी न-हे परिसरात ही घटना घडली.
फिर्यादी त्यांच्या कार्यालयात अचानक आरोपींनी येत कोयते, हॉकी स्ट्रीकची भीती दाखवून फिर्यादींना धमकी देऊन त्यांच्याकडे १५ हजार रुपयांची खंडणी मागितली. फिर्यादींना शिवीगाळ करून त्यांच्याकडून १० हजार रूपये आरोपी घेऊन गेले. त्यानंतर रस्त्यावर जाणा-या लोकांना, दुकानदारांना हत्यारांचा धाक दाखवून सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी काझी याला न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी, त्यांनी अशा प्रकारे आणखी कोणाकडून खंडणी घेतली आहे का?, त्यांचा आणखी कोणी साथीदार आहे का?, याचा तपास करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. ती मागणी न्यायालयाने मान्य केली.