कोरेगाव भीमा येथे १५३ जणांनी घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:10 AM2021-04-18T04:10:01+5:302021-04-18T04:10:01+5:30
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून ग्रामीण भागातील ग्रामस्थांना राज्य शासनाकडून मास्क वापरण्यासह सोशल डिस्टन्स ठेवण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच ...
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून ग्रामीण भागातील ग्रामस्थांना राज्य शासनाकडून मास्क वापरण्यासह सोशल डिस्टन्स ठेवण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच मार्च महिन्यापासून कोविड-१९ लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे व सरपंच अमोल गव्हाणे यांच्या पुढाकाराने व प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव ढमढेरे येथील आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी प्रज्ञा घोरपडे यांच्या वतीने कोरेगाव भीमा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १५३ जणांना लसीकरण करण्यात आले.
यावेळी आरोग्य पर्यवेक्षक जालिंदर मारणे, कैलास सोनवणे माजी संचालक घोडगंगा सहकारी साखर कारखाना, शिवसेना नेते अनिल काशीद, सरपंच अमोल गव्हाणे, माजी सरपंच विजय गव्हाणे, संदीप ढेरंगे, माजी उपसरपंच नितीन गव्हाणे, ग्रा. पं. सदस्य केशव फडतरे, महेश ढेरंगे, संपत गव्हाणे, रमेश शिंदे, बन्सी फडतरे, प्रदीप काशीद, आरोग्य कर्मचारी संतोष थिटे, आशासेविका अमृता गव्हाणे, सुनीता पाटील, सोनाली राऊत, मंगल खरात आदी उपस्थित होते.
एक हजारपेक्षा जास्त नागरिकांना लस उपलब्ध करून देणार
सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या सदस्या कुसुम मांढरे व प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव ढमढेरे येथील वैद्यकीय अधिकारी प्रज्ञा घोरपडे यांच्या माध्यमातून कोरेगाव भीमा येथे किमान एक हजार नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस मिळवून देणार असल्याचे सरपंच अमोल गव्हाणे यांनी सांगितले.
१७ कोरेगाव भीमा लस
कोरेगाव भीमा येथे लसीकरणाची सुरूवात करताना मान्यवर.