लॉकडाऊनच्या काळात १५५ विद्यार्थ्यांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:11 AM2021-04-14T04:11:34+5:302021-04-14T04:11:34+5:30

बारामती :ऐन कोरोना काळात माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये चालू शैक्षणिक वषार्तील १५५ विद्यार्थ्यांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड करण्यात ...

155 students during lockdown | लॉकडाऊनच्या काळात १५५ विद्यार्थ्यांची

लॉकडाऊनच्या काळात १५५ विद्यार्थ्यांची

Next

बारामती :ऐन कोरोना काळात माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये चालू शैक्षणिक वषार्तील १५५ विद्यार्थ्यांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड करण्यात आली.

शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. मागील शैक्षणिक वर्षापासून लॉकडाऊन मुळे शैक्षणिक व्यवस्थेमध्ये बदल झाले आहेत,तसेच उद्योग क्षेत्रात आलेली मंदी यामुळे विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी मिळवणे अडचणीचे ठरले आहे.या परिस्थितीमध्ये माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयाने मागील वर्षी २९० विद्यार्थ्यांना तसेच चालू वर्षी १५५ विद्यार्थ्यांना दजेर्दार राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम. मुकणे यांनी दिली.चालू शैक्षणिक वर्षामध्ये आॅनलाईन व आॅफलाईन पद्धतीने निवडीच्या प्रक्रियेचे आयोजन महाविद्यालयातर्फे करण्यात आले.निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक वेतन ३.५ लाखापासून ते ६.५५ लाखांपर्यंत कंपनीतर्फे देण्यात येणार आहे. इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, रिलायन्स जिओ, कॅपजेमिनी, पर्सिस्टंट, जोरीयंट, झेनसॉफ्ट, जेड ग्लोबल, अ‍ॅक्टिव्ह सिस्टीम, सिंटेल इत्यादी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मिळाली.

विद्यार्थ्यांना चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालय नेहमी नवनवीन उपक्रम राबवत आहे ,अशी माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग व प्लेसमेंट आॅफिसर डॉ. माधव राउळ यांनी दिली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष व माळेगाव सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, कारखान्याचे उपाध्यक्ष तानाजी कोकरे, संचालक मंडळ, विश्वस्त वसंतराव तावरे, अनिल जगताप, महेंद्र तावरे, रामदास आटोळे, गणपत देवकाते, रवींद्र थोरात, सीमा जाधव, चैत्राली गावडे व संस्थेचे सचिव प्रमोद शिंदे यांनी अभिनंदन केले.

————————————————

Web Title: 155 students during lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.