मंगळवारी १५९ कोरोना बाधित : १३० कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:13 AM2021-09-22T04:13:20+5:302021-09-22T04:13:20+5:30
पुणे : शहरात मंगळवारी १५९ कोरोना बाधित आढळून आले असून, १३० जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ...
पुणे : शहरात मंगळवारी १५९ कोरोना बाधित आढळून आले असून, १३० जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ६ हजार १८७ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोना बाधितांची टक्केवारी २.५६ टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या आजमितीला १ हजार ५९६ सक्रिय रुग्ण आहेत. तर दिवसभरात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी २ जण हे पुण्याबाहेरील आहे. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही १८० इतकी असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २६८ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत ३२ लाख ९७ हजार ७५४ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ९९ हजार ६१८ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ८९ हजार १४ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ९ हजार ८ जणांचा मृत्यू झाला आहे.
------------