इंदापूर येथे शासकीय रक्तदान शिबिरात १५९ जणांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:13 AM2021-09-24T04:13:25+5:302021-09-24T04:13:25+5:30

इंदापूर शहरातील शहा सांस्कृतिक भवन येथे बुधवार ( दि. २२ ) रोजी इंदापूर तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या हस्ते शिबिराचे ...

159 people donated blood in the government blood donation camp at Indapur | इंदापूर येथे शासकीय रक्तदान शिबिरात १५९ जणांनी केले रक्तदान

इंदापूर येथे शासकीय रक्तदान शिबिरात १५९ जणांनी केले रक्तदान

Next

इंदापूर शहरातील शहा सांस्कृतिक भवन येथे बुधवार ( दि. २२ ) रोजी इंदापूर तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट युथ डायरेक्ट वसंतराव माळुंजकर, नायब तहसीलदार अनिल ठोंबरे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुहास शेळके, सहायक गटविकास अधिकारी डॉ. रामचंद्र शिंदे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय लिगाडे, भूमिअभिलेख अधिकारी रवींद्र पिसे, गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रुपनगर, तलाठी सचिन करगळ यांच्यासह तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील गावडे, इंदापूर रोटरी क्लबचे अध्यक्ष उदय शहा भिगवन रोटरीचे अध्यक्ष संजय खाडे, वरकुटे रोटरीचे अध्यक्ष शशिकांत शेंडे, भिगवनचे नामदेव कुदळे, माळवाडीचे पोलीस पाटील अमोल व्यवहारे, हिंगणगावचे शरद पाटील, नेताजी मित्र मंडळाचे अध्यक्ष शुभम पवार आदी मान्यवर उपस्थित होते. या रक्तदान शिबिरासाठी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांनी कार्यालय मोफत दिले, तर मुक्ताई ब्लड सेंटर इंदापूरचे ननवरे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी रक्त संकलनास सहकार्य केले.

--

२३ इंदापूर शासकीय रक्तदान शिबिर

फोटो ओळ : इंदापूर येथे रक्तदान शिबिरात रक्तदान करताना तहसीलदार श्रीकांत पाटील.

Web Title: 159 people donated blood in the government blood donation camp at Indapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.