इंदापूर येथे १५९ जणांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:13 AM2021-09-23T04:13:30+5:302021-09-23T04:13:30+5:30
इंदापूर शहरातील शहा सांस्कृतिक भवन येथे बुधवार (दि.२२) रोजी इंदापूर तहसिलदार श्रीकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ...
इंदापूर शहरातील शहा सांस्कृतिक भवन येथे बुधवार (दि.२२) रोजी इंदापूर तहसिलदार श्रीकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट यूथ डायरेक्टर वसंतराव माळुंजकर, नायब तहसीलदार अनिल ठोंबरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुहास शेळके, सहायक गटविकास अधिकारी डॉ. रामचंद्र शिंदे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय लिगाडे, भूमी अभिलेख अधिकारी रवींद्र पिसे, गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रूपनगर, तलाठी सचिन करगळ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील गावडे, इंदापूर रोटरी क्लबचे अध्यक्ष उदय शह, भिगवन रोटरीचे अध्यक्ष संजय खाडे, वरकुटे रोटरीचे अध्यक्ष शशिकांत शेंडे, भिगवनचे नामदेव कुदळे, माळवाडीचे पोलीस पाटील, अमोल व्यवहारे, हिंगणगावचे शरद पाटील, नेताजी मित्रमंडळाचे अध्यक्ष शुभम पवार आदी मान्यवर उपस्थित होते. रक्तदान शिबिरासाठी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांनी कार्यालय मोफत दिले, तर मुक्ताई ब्लड सेंटर इंदापूरचे ननवरे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी रक्त संकलनास सहकार्य केले.