जुन्नर तालुक्यातील विकासकामांसाठी १६ कोेटी २० लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:10 AM2021-05-21T04:10:52+5:302021-05-21T04:10:52+5:30
खोडद : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर ...
खोडद : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर तालुक्यात एका महिन्यात १७५ विविध विकासकामांना १६ कोटी २० लाख ५३ हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल वल्लभ बेनके यांनी दिली.
आमदार अतुल बेनके म्हणाले की, जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत अतिवृष्टी, गारपीट, पुरपरिस्थिती करायच्या उपाय योजना योजनेअंतर्गत ८ कामांना १ कोटी ५२ लाख रुपये , जिल्हा वार्षिक योजना अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत ६ साकव कामांना २ कोटी रुपये ,जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत क वर्ग पर्यटनस्थळ विकासासाठी ३ कामांना ६० लाख रुपये, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत आदिवासी उपाययोजना १ साकव कामाला ३० लाख रुपये, डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत २७ कामांना १ कोटी १७ लाख ४७ हजार रुपये, आमदार स्थानिक विकास कार्यक्रम २०-२१ अंतर्गत ८१ कामांना ४ कोटी २३ लाख २१ हजार रुपये, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत तीर्थक्षेत्र १ कामाला २० लाख रुपये, सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत कोविड १ कामाला १० लाख रुपये, सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत ऑक्सिजन पुरवठा करणे १ कामाला ४१ लाख रुपये ,रस्ते व पूल दुरूस्ती ३०-५४ कार्यक्रमांतर्गत गट-ब व गट-ड मधील २ कामांना ५५ लाख रुपये, जिल्हा गौण खनिज अंतर्गत २८ कामांना १ कोटी ५० लाख रुपये, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत राजुरी व ओतूर स्मशानभूमी गॅस शवदाहिनी बसवणे २ कामांना १ कोटी ८० लाख ९२ हजार रुपये, जिल्हा वार्षिक योजना आदिवासी ठक्कर बाप्पा योजना अंतर्गत १२ कामांना १ कोटी २९ लाख ९३ हजार रुपये, जिल्हा वार्षिक योजना अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत पशुपालकांसाठी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ बेल्हे येथे क्ष किरण यंत्रणा बसवणे १ कामाला ४९ लाख ५० हजार रुपये मंजूर झाले असून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन ही कामे सुरू होतील, अशी माहिती आमदार बेनके यांनी दिली.
२० खोडद