बनावट प्रोजेक्टची माहिती देऊन १६ लाखांची फसवणूक

By भाग्यश्री गिलडा | Published: July 13, 2023 03:32 PM2023-07-13T15:32:09+5:302023-07-13T15:32:17+5:30

बनावट प्रोजेक्टची माहिती देऊन २५ टक्के गुंतवणूक केल्यास फायदा होईल असे सांगून फसवणूक

16 lakh fraud by giving fake project information | बनावट प्रोजेक्टची माहिती देऊन १६ लाखांची फसवणूक

बनावट प्रोजेक्टची माहिती देऊन १६ लाखांची फसवणूक

googlenewsNext

पुणे : बनावट प्रोजेक्टची माहिती देऊन २५ टक्के गुंतवणूक केल्यास फायदा होईल असे सांगून एकाची फसवणूक केल्याची घटना कॅम्प परिसरात घडली आहे.

इश्तियाक अश्फाक कुरेशी (वय ४२, रा. कॅम्प) यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, मुदस्सीर हानिफ दादापुरे याने कुरेशी यांना एका बनावट प्रोजेक्टबद्दल माहिती दिली. २५ टक्के रक्कमेची गुंतवणूक केल्यास त्याचा चांगला फायदा होईल असे दादापुरे याने सांगितले. गुंतवणुकीसाठी ३१ लाख ५६ हजार रुपये ऑनलाईन स्वरूपात आणि ३ लाख ५० हजार कॅश स्वरूपात घेतले. दादापुरेने पैसे गुंतवणूक न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरले. दादापुरे याने घेतलेल्या रकमेपैकी फक्त ३१ लाख ५६ हजार १२५ रुपये परत केले. मात्र त्यावर प्रॉफिट म्हणून मिळालेले १२ लाख ३९ हजार पाचशे रुपये आणि कॅश स्वरूपात घेतलेले साडेतीन लाख रुपये असे एकूण १५ लाख ८९ हजार ५०० रुपये न देता कुरेशी यांची फसवणूक केली. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक जाधव या पुढील तपास करत आहेत.

Web Title: 16 lakh fraud by giving fake project information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.