सापळा रचून पकडली १६ लाखांची विदेशी दारू

By admin | Published: June 21, 2017 06:25 AM2017-06-21T06:25:40+5:302017-06-21T06:25:40+5:30

सणसर (ता. इंदापूर) येथे एका हॉटेलवर छापा टाकून बारामती गुन्हे शोधपथकानेमंगळवारी (दि. २०) छापा टाकला. या वेळी पथकाने १६.५ लाखांची विदेशी दारू जप्त केली आहे

16 million foreign liquor caught in the trap | सापळा रचून पकडली १६ लाखांची विदेशी दारू

सापळा रचून पकडली १६ लाखांची विदेशी दारू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : सणसर (ता. इंदापूर) येथे एका हॉटेलवर छापा टाकून बारामती गुन्हे शोधपथकानेमंगळवारी (दि. २०) छापा टाकला. या वेळी पथकाने १६.५ लाखांची विदेशी दारू जप्त केली आहे. या कारवाईमुळे सणसर परिसरात खळबळ उडाली आहे. सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
सणसर (ता. इंदापूर) येथे हॉटेल जगदंबावर छापा टाकून १६.५० लाखांची दारू जप्त करण्यात आली. जगदंबा हॉटेल येथे बेकायदा बिगरपरवाना चोरून दारूविक्री होत असल्याची कुणकुण पोलिसांना लागली. या माहितीची खात्री करण्यासाठी या हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकला असता विदेशी दारू खाली करण्यासाठी यावेळी टेम्पो आला होता.
तो टेम्पो पूर्ण विदेशी दारूच्या बॉक्सने भरला होता. त्यामधील व हॉटेलमधील विदेशी दारूचे फे्रंड्स व्हिस्कीचे ५ बॉक्स, आॅफिसर चॉईसचे १४६, टुबर्गचे ३२, बॅगपायपर व्हिस्कीचे ८ , मॅकडॉनल्ड नं. १ चे ४४, रॉयल स्टॅग १०, झिंगारो बिअर १०, किंगफिशर बियर ५, बडवेट ९, डॉक्टर ब्रँडी १८, ब्लेंडर्स प्राईड २, इम्पिरिअल ब्ल्यू १०, रॉयल चॉईस व्हिस्की १, व्हियर मिश्चिफ व्होडका १, स्नो व्हाईट व्होडका, एपीएम, पापा ८८८ व्हिस्की १ बॉक्स आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला. या वेळी कारवाईदरम्यान विक्रम शामराव भागवत (रा. सणसर, ता. इंदापूर), बबन विठ्ठल सूर्यवंशी (रा. फुरसुंगी, पुणे), बालाजी विठ्ठल सूर्यवंशी (रा. फुरसुंगी, पुणे) या तिघांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
या कारवाईत १९ लाख ६३ हजार ६९४ रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती गुन्हे शोधपथकाचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरक्षक उत्तम भजनावळे, पोलीस नाईक संदीप जाधव, पोलीस हवालदार शिवाजी निकम, बाळासाहेब भोई, अनिल काळे, शिंदे, तावरे पोलीस कॉन्स्टेबल तुषार सानप, काटकर यांनी सापळा रचून गुन्हा उघडकीस आणला.

Web Title: 16 million foreign liquor caught in the trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.