१६ तोळे सोने चोरीला ;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:11 AM2021-03-20T04:11:06+5:302021-03-20T04:11:06+5:30

नारायणगाव :- कांदळी गावाच्या हद्दीतील १४ नंबर येथे अज्ञात चोरटयांनी बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून १५ ते १६ तोळे ...

16 ounces of gold stolen; | १६ तोळे सोने चोरीला ;

१६ तोळे सोने चोरीला ;

Next

नारायणगाव :- कांदळी गावाच्या हद्दीतील १४ नंबर येथे अज्ञात चोरटयांनी बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून १५ ते १६ तोळे सोने चोरून नेल्याची घटना काल (दि १८) मध्यरात्री ३ वा सुमारास घडली , अशी माहिती राजेंद्र दशरथ भोर यांनी दिली आहे .

राजेंद्र दशरथ भोर (रा १४ नंबर,कांदळी ता. जुन्नर यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे .

याबाबत अधिक माहिती अशी , रेश्मा भोर यांनी दि. १८ रोजी पहाटे ३. १५ वा. च्या सुमारास राजेंद्र भोर यांना फोन करून तुमच्या जुने घरातून कशाचा तरी आवाज येत आहे असांगितले आणि त्यांनी घरातूनच आरडा ओरडा केला. आसपासचे शेजारी असलेले लोक जागे होवून बॅटऱ्या घेवून बाहेर आले. तेव्हा त्यांना भोर यांच्या घराचा दरवाजा व खिडकी उघडी असलेली दिसली. त्यावेळी राजेंद्र भोर यांनी घरात जाऊन पाहणी केली असता घराच्या दरवाजाचा कोयंडा तोडलेला दिसला. घरात जावून पाहीले असता घरात घरातील साहीत्य अस्थाव्यस्त पडलेले दिसले. तसेच घरातील कपाट उचकटलेले दिसले . त्यामध्ये भोर यांच्या आईचे ठेवलेले ५ तोळे वजनाचे मंगळसूत्र ,४ तोळे वजनाची मण्याची माळ ,२ तोळे पदक असलेलेही चैन , दीड तोळे वजनाचा नेकलेस ,अर्धा तोळे वजनाचे कानातील झुमके असे १५ ते १६ तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरटयांनी चोरून नेले आहेत . अज्ञात चोरटे हे दोन दुचाकीवर आले होते . एक जण घराच्या बाहेर उभा होता तर ४ ते ५ जण घरात जाऊन चोरी करीत होते . अशी माहिती भोर यांनी दिली . या घटनेनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक पृध्वीराज ताटे यांनी भेट देऊन पाहणी केली . घटनास्थळी श्वान पथकचे पोलीस हवालदार गणेश फापाळे ,सागर रोकडे यांनी श्वान दुर्गा हिच्या मदतीने माग काढण्याचा प्रयत्न केला .ठसे तज्ज्ञ शिंगाडे ,रवी भोसले यांनी घटनास्थळाचे प्रिंट घेतले आहेत.

Web Title: 16 ounces of gold stolen;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.