पुण्यात १६ टक्केच ‘हेल्मेटदक्ष’; महिलांचे प्रमाण केवळ ८ टक्के

By admin | Published: May 11, 2017 05:00 AM2017-05-11T05:00:12+5:302017-05-11T05:00:12+5:30

कोणतीही सक्ती ही खरे तर वाईटच! पण, एखादा वाहतुकीचा नियम हा दीर्घायुष्यासाठी हितावह ठरणारा असेल तर तो पाळला जाणे

16 percent of 'helmet' in Pune; The percentage of women is only 8 percent | पुण्यात १६ टक्केच ‘हेल्मेटदक्ष’; महिलांचे प्रमाण केवळ ८ टक्के

पुण्यात १६ टक्केच ‘हेल्मेटदक्ष’; महिलांचे प्रमाण केवळ ८ टक्के

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोणतीही सक्ती ही खरे तर वाईटच! पण, एखादा वाहतुकीचा नियम हा दीर्घायुष्यासाठी हितावह ठरणारा असेल तर तो पाळला जाणे आवश्यक आहे, यावर कोणाचेच दुमत असण्याचे कारण नाही. मात्र, नियम कसा जाचक आहे, हेच जर पालुपद घोकत राहिले, तर चांगल्या गोष्टींची अंमलबाजवणी केवळ नागरिकांमधील जागरूकतेच्या अभावामुळे कशी लागू होऊ शकत नाही, याचे एकमेव उदाहरण म्हणजे ‘हेल्मेटचा होणारा वापर!’ एका स्वयंसेवी संस्थेने केलेल्या पाहणीमधून पुण्यात हेल्मेट परिधान करण्याबाबत दक्ष असण्याचे प्रमाण हे अवघे १६ टक्केच असल्याचे समोर आले असून, पुरुषांच्या तुलनेत हेल्मेट वापरण्याचे प्रमाण महिलांमध्ये केवळ ८ टक्केच असल्याचे निदर्शनास आले आहे.
पुण्यात कोणतीही गोष्ट यशस्वी झाली, की ती सर्वत्र प्रचलित होते असे म्हणतात; मात्र वाहतूक शाखेने हेल्मेट सक्तीच्या दिशेने उचलले पाऊल पुणेकरांच्या आडमुठेपणाच्या भूमिकेमुळे पुढे पडू शकलेले नाही, हे या आकडेवारीमधूनच काहीअंशी खरे ठरले आहे. इंडियन मोटर व्हेईकल अ‍ॅक्ट १९८८ नुसार दुचाकीचालक आणि मागे बसणारी व्यक्ती या दोघांना हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. लोकसभेत नुकत्याच मंजूर केलेल्या नवीन कायद्यातही वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाईचा बडगा उगारण्याचे संकेतही देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर, पुण्यातील ‘परिसर’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे शहरातील विविध चौकांमध्ये ७६९ वाहनचालकांची एक प्राथमिक पाहणी करण्यात आली आणि ५८ छायाचित्रे काढण्यात आली. या छायाचित्रांच्या निरीक्षणातून केवळ १६ टक्केच पुणेकरच हेल्मेट परिधान करण्याबाबत जागरूक असल्याचे दिसून आले आहे. पुरुष आणि महिला दोघांमध्येही हेल्मेट वापरण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. विशेषत: पुरुषांचे प्रमाण हे १८ टक्के असून, त्यातुलनेत महिलांचे प्रमाण हे २ टक्के इतकेच असल्याचे पाहणीतून समोर आले आहे. लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी पुणेकरांकडून हेल्मेट वापरण्याला प्राधान्य दिले जाते; मात्र घरापासून दोन ते तीन किलोमीटरवर जाण्यासाठी हेल्मेटला बगल दिली जात असल्याचे आढळले आहे.
याशिवाय ११० पुणेकरांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या. त्यात हेल्मेटचे वजन, ते आकर्षक नसणे, अत्यंत वाईट डिझाईन, धिम्या गतीने गाडी चालविणाऱ्यांना हेल्मेटची काय गरज? अशी असंख्य कारणे हेल्मेट न वापरण्यासाठी देण्यात आली.
यामध्ये ५९ टक्के पुणेकर हेल्मेट सक्तीच्या विरोधात होते,
३२ टक्के लोकांनी हेल्मेटच्या डिझाईनमध्ये बदल करण्याची
मागणी केली, तर इतरांनी वाहनचालकाच्या मागे बसणाऱ्या व्यक्तीला हेल्मेट घालण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले.

Web Title: 16 percent of 'helmet' in Pune; The percentage of women is only 8 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.