चासकमानमध्ये १६ टक्के साठा
By admin | Published: May 8, 2015 05:14 AM2015-05-08T05:14:45+5:302015-05-08T05:14:45+5:30
खेड तालुक्यासह शिरूर तालुक्याचे नंदनवन करणाऱ्या चासकमान धरणात आजअखेर १६.१० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
चासकमान : खेड तालुक्यासह शिरूर तालुक्याचे नंदनवन करणाऱ्या चासकमान धरणात आजअखेर
१६.१० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. ५० दिवसांपासून कालव्याद्वारे आवर्तन सुरू असल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे.
सध्या धरणात एकूण पाणीपातळी ६३४.४३ द.ल.घ.मी., एकूण साठा ६१.७२ द.ल.घ.मी., उपयुक्त साठा ३४.५३ द.ल.घ.मी. शिल्लक राहिला आहे. धरणात
फक्त १६.१० टक्के पाणी आहे.
५० दिवसांच्या आवर्तनात
जवळजवळ ३०.५६ टक्के पाणीसाठा कमी झाला आहे.
आवर्तन बंद करण्याचे कोणतेही नियोजन नाही. मात्र, तीन ते चार दिवसांत आवर्तन बंद होण्याचे संकेत शाखा अभियंता एस. एन. भुजबळ यांनी दिले. पावसाचे आगमन लांबले व धरणातील पाण्याचा उपसा असाच सुरू राहिला, तर पिण्याच्या पाण्याचे नियोजन कशा प्रकारे होणार, हा प्रश्न अनुत्तरित राहणार आहे.