ओतूर उपबाजारात १६ हजार ९८२ कांदा पिशवी आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:08 AM2021-07-05T04:08:18+5:302021-07-05T04:08:18+5:30

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार ओतूर येथे रविवारी फक्त १६ हजार ९८२ कांदा पिशव्यांची आवक होऊन प्रतवारीनुसार ...

16 thousand 982 onion bags arrived in Ootur sub-market | ओतूर उपबाजारात १६ हजार ९८२ कांदा पिशवी आवक

ओतूर उपबाजारात १६ हजार ९८२ कांदा पिशवी आवक

Next

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार ओतूर येथे रविवारी फक्त १६ हजार ९८२ कांदा पिशव्यांची आवक होऊन प्रतवारीनुसार नं. १ गोळा कांद्यास १० किलोस १८० रुपये ते २०१ रुपये बाजारभाव मिळाला. याच कांद्यास गुरुवारी जो भाव मिळाला त्या भावात सरासरी १० रुपयांची घसरण झाली आहे. गेले काही दिवसांनी बाजारभावात सातत्याने घसरण सुरूच आहे, अशी माहिती जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅड. संजय काळे व उपसभापती दिलीप डुंबरे ओतूर मार्केटचे कार्यालयप्रमुख दीपक मस्करे यांनी दिली. रविवारी प्रतवारीनुसार १० किलोचे भाव :

कांदा नं. १ (गोळा)--१८० रुपये ते २०१ रुपये .

कांदा नं. २ - (सुपर कांदा)--१५० रुपये ते १८० रुपये .

कांदा नं. ३--(गोल्टा ) -९० रुपये ते १५० रुपये ।

कांदा नं. ४--( गोलटी / बदला) -३० रुपये ते ९० रुपये.

Web Title: 16 thousand 982 onion bags arrived in Ootur sub-market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.