नोकरीसाठी गमावले १६ हजार, शाईन डॉट कॉमवर घडला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 01:56 AM2018-12-28T01:56:59+5:302018-12-28T01:57:13+5:30

नोकरीसाठी शाईन डॉट कॉमवर बायोडाटा अपलोड केला असता आलेल्या लिंकवर रजिस्ट्रेशनसाठी डेबिट कार्डद्वारे ३० रुपये एका तरुणीने भरले.

16 thousand lost for jobs, type of Shine.com | नोकरीसाठी गमावले १६ हजार, शाईन डॉट कॉमवर घडला प्रकार

नोकरीसाठी गमावले १६ हजार, शाईन डॉट कॉमवर घडला प्रकार

googlenewsNext

पुणे : नोकरीसाठी शाईन डॉट कॉमवर बायोडाटा अपलोड केला असता आलेल्या लिंकवर रजिस्ट्रेशनसाठी डेबिट कार्डद्वारे ३० रुपये एका तरुणीने भरले़ त्यानंतर या तरुणीच्या बँक खात्यातून चार व्यवहारांद्वारे तब्बल १६ हजार रुपये परस्पर काढण्यात आले़ अशा प्रकारे नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या शेकडो तरुणांना याचा फटका बसला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत चार्टर्ड अकौंटंट असलेल्या तरुणीने माहिती दिली़ त्यांनी शाईन डॉट कॉम या वेबसाईटवर त्यांचा बायोडाटा अपलोड केला होता़ दोन दिवसांनी त्यांना कॉल आला व तुमचे नाव एका बँकेच्या नोकरीसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले़ आमच्या ड्युटी शाईन डॉट कॉम या पोर्टलवर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल़ त्यासाठी ३० रुपये भरावे लागेल, असे सांगण्यात आले़ त्यानुसार त्यांना पाठविलेल्या लिंकवर त्यांनी रजिस्ट्रेशन केले व ३० रुपये डेबिट कार्डद्वारे भरले़ त्यासाठी डिटेल दिले़ त्यानंतर काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून ४ हजार ९९९, ३ हजार ३०, ४ हजार ९९९ आणि २ हजार ९८० रुपये काढले गेले़ त्यांच्या मोबाईलवर बँकेचा ओटीपी येत होता़ त्यापाठोपाठ पैसे काढल्याचा मेसेज येत होता.
याबाबत त्यांनी फोन करून चौकशी केल्यावर तुम्हाला पैसे रिफंड केले जातील, असे सांगण्यात आले़ पण अजूनही पैसे परत करण्यात आले नाही, की त्यांच्या परस्पर त्यांचा डाटा हॅक करून बँक खात्यातून पैसे काढले गेले. 

उत्तर प्रदेशमधून सर्व कॉल
कांतिलाल टेकणे यांनी सांगितले, की अशा प्रकारे शेकडो तरुणांची फसवणूक होण्याची शक्यता असून शाईन डॉट कॉमचा डाटा दुसºयाकडे कसा गेला़ याबाबत आम्ही दुसºया नावाने त्यांना फोन करून रजिस्ट्रेशन करण्याचा व नेटबँकिंगद्वारे पैसे भरण्याचा प्रयत्न केला़ पण त्यांनी डेबिट कार्डद्वारेच पैसे भरतात येतात, असे सांगितले़ या कॉलची तपासणी केल्यावर ते सर्व कॉल उत्तर प्रदेशातील असल्याचे समजले़ याबाबत आम्ही बँकेकडेही तक्रार केली असल्याचे त्यांनी सांगितले. 
त्यांनी अलंकार पोलीस ठाण्याशी संपर्क साधून त्यांच्याकडे फिर्याद देण्याचा प्रयत्न केला़ परंतु, त्यांना तुम्ही सायबर क्राईमशी संपर्क साधा, असे सांगून त्यांची तक्रार घेण्यात आली नसल्याचे या तरुणीने सांगितले. 

Web Title: 16 thousand lost for jobs, type of Shine.com

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.