तीन महिन्यांचे वीजबिल थकल्याने १६ हजार पुणेकरांची बत्ती गुल, आणखी ७१ हजार अंधारात जाणार होणार

By नितीन चौधरी | Published: May 9, 2023 02:52 PM2023-05-09T14:52:25+5:302023-05-09T14:53:24+5:30

वीजग्राहकांनी थकीत बिलांचा ताबडतोब भरणा न केल्यास वीजपुरवठा खंडित करण्याच्या नियमित कारवाईसोबतच ही धडक मोहीम महावितरणकडून सुरू

16,000 Pune residents will be left without power due to overdue electricity bills for three months, and another 71,000 arrears will be cut off. | तीन महिन्यांचे वीजबिल थकल्याने १६ हजार पुणेकरांची बत्ती गुल, आणखी ७१ हजार अंधारात जाणार होणार

तीन महिन्यांचे वीजबिल थकल्याने १६ हजार पुणेकरांची बत्ती गुल, आणखी ७१ हजार अंधारात जाणार होणार

googlenewsNext

पुणे : पुणे परिमंडलामध्ये गेल्या तीन महिन्यांपासून वीजबिल न भरणाऱ्या १६ हजार ४१३ घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तर आणखी ७१ हजार ९८ थकबाकीदारांची वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु आहे. वीजग्राहकांनी थकीत बिलांचा ताबडतोब भरणा न केल्यास वीजपुरवठा खंडित करण्याच्या नियमित कारवाईसोबतच ही धडक मोहीम महावितरणकडून सुरू आहे. यात पुणे शहरातील ६ हजार ५३६ ग्राहकांचा समावेश आहे.

पुणे परिमंडलामध्ये तीन महिन्यांपासून विजेचे एकही बिल न भरणाऱ्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये ५०० रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या ८७ हजार ५११ वीजग्राहकांनी तीन महिन्यांत एकही वीजबिल भरलेले नाही व त्यांच्याकडे ४२ कोटी ६३ लाख रूपयांची थकबाकी असल्याचे निदर्शनास आले. ज्या ग्राहकांनी थकीत बिलांचा भरणा केला नाही त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची विशेष मोहीम गेल्या एप्रिलपासून सुरु करण्यात आली आहे. यामध्ये १३ कोटी ३७ लाख रूपयांच्या थकबाकीपोटी आतापर्यंत १६ हजार ४१३ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तर आणखी ७१ हजार ९८ ग्राहकांकडे २९ कोटी २८ लाख रूपयांची थकबाकी आहे. त्यांचाही वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू आहे.

पुण्यात साडेसहा हजार ग्राहकांचे तोडले कनेक्शन

पुणे शहरात अशा २६ हजार ७९६ ग्राहकांकडे ११ कोटी ८१ लाख रूपयांची थकबाकी आहे. त्यातील ६ हजार ५३६ ग्राहकांचा ४ कोटी ७१ लाखांच्या थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे तर उर्वरित २० हजार २६० ग्राहकांकडे थकीत ७ कोटी १२ लाख रुपयांची थकबाकी आहे. पिंपरी चिंचवड शहरात १६ हजार ३०० ग्राहकांनी गेल्या तीन महिन्यांपासून १० कोटी ९१ लाख थकीत बिलांचा भरणा केलेला नाही. आतापर्यंत तीन हजार २०९ वीजग्राहकांचा ३ कोटी ५० लाखांच्या थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे तर आणखी १३ हजार ९१ ग्राहकांकडे ७ कोटी ४१ लाखांची थकबाकी आहे.

सात तालुक्यांत २० कोटी थकबाकी

जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यांमध्ये ४४ हजार ४१५ घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांनी १९ कोटी ९१ लाख रूपयांच्या थकीत बिलांचा भरणा केला नाही. त्यातील ६ हजार ६६९ ग्राहकांचा वीजपुरवठा ५ कोटी १६ लाखांच्या थकबाकीपोटी खंडित करण्यात आला आहे. तर उर्वरित ३७ हजार ७४७ वीजग्राहकांकडे १४ कोटी ७५ लाखांची थकबाकी आहे. थकीत वीजबिलांचा ताबडतोब भरणा करून सहकार्य करावे व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Web Title: 16,000 Pune residents will be left without power due to overdue electricity bills for three months, and another 71,000 arrears will be cut off.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.