बारावीचे १६२; दहावीचे १०२ ट्रान्सजेंडर विद्यार्थी देणार परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:10 AM2021-04-04T04:10:43+5:302021-04-04T04:10:43+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांतर्गत बारावीचे १३ लाख १७ हजार ७६ विद्यार्थी तर ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांतर्गत बारावीचे १३ लाख १७ हजार ७६ विद्यार्थी तर दहावीचे सोळा लाख २०६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यात बारावीच्या एकूण ६ लाख ७ हजार ९८८ मुलींनी, तर ६ लाख ३३ हजार २६ मुलांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. तसेच दहावीच्या ७ लाख ३३ हजार ५३२ मुलींनी, तर ८ लाख ६६ हजार ५७२ मुलांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. परीक्षा देणाऱ्या मुला-मुलींच्या संख्येच्या तुलनेत ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून परीक्षा देणाऱ्या ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांची संख्या वाढत चालली आहे.
------
परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांच्या आकडेवारी
विभाग बारावी दहावी
पुणे ४० १६
नागपूर १९ १३
औरंगाबाद ३१ १६
मुंबई ३० २३
कोल्हापूर ९ ८
अमरावती १० ३
नाशिक १२ १४
लातूर १० ९
कोकण १ ०