भामा-आसखेडच्या पुनर्स्थापनापनासाठी १६२ कोटींचा निधी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 02:25 PM2018-08-29T14:25:22+5:302018-08-29T14:32:15+5:30

भामा-आसखेड योजनेसाठी महापालिकेस पाणी देताना, या पाण्यामुळे या धरणाचे जेवढे क्षेत्र ओलिताखाली येणार होते. त्याचा मोबदला म्हणून जलसंपदा विभागाने पालिकेकडे पुनर्स्थापना खर्चाची मागणी केली होती.

162 crores fund for rehabilitation of Bhama-Askhed | भामा-आसखेडच्या पुनर्स्थापनापनासाठी १६२ कोटींचा निधी 

भामा-आसखेडच्या पुनर्स्थापनापनासाठी १६२ कोटींचा निधी 

Next
ठळक मुद्देखर्चातील ५० टक्के निधी केंद्रशासन, २० टक्के निधी राज्यशासन तर ३० टक्के निधी महापालिका देणार पुढील वर्षीच्या अंदाजपत्रकापासून टप्प्याटप्प्याने तरतूद करण्यास स्थायी समितीची मान्यताभामा-आसखेड प्रकल्पाचा एकूण खर्च ३८० कोटी रुपये

पुणे: शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी भामा-आसखेड योजने अंतर्गत सिंचन पुनर्स्थापना खर्च म्हणून रुपये १६२ कोटी रुपये आणि त्यावरील विलंब शुल्कापोटी २०१३ पासून १२ टक्के दराने व्याज भरण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यासाठी पुढील वर्षीच्या अंदाजपत्रकापासून टप्प्याटप्प्याने तरतूद करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
भामा-आसखेड योजनेसाठी महापालिकेस पाणी देताना, या पाण्यामुळे या धरणाचे जेवढे क्षेत्र ओलिताखाली येणार होते. त्याचा मोबदला म्हणून जलसंपदा विभागाने पालिकेकडे या पुनर्स्थापना खर्चाची मागणी केली होती. पिंपरी-चिंचवड महापालिकेने या योजनेसाठी त्यांना जलसंपदा विभागाने मागितलेली सिंचन पुनर्स्थापना खर्च देण्याची या आधीच तयारी दर्शविली आहे. भामा-आसखेडचा एकूण प्रकल्पाचा खर्च ३८० कोटी रुपये इतका आहे. बंद जलवाहिनीद्वारे हे पाणी आणले जाणार आहे. खर्चातील ५० टक्के निधी केंद्रशासन, २० टक्के निधी राज्यशासन तर ३० टक्के निधी महापालिका देणार आहे. या योजनेचे पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण झाले आहे. महापालिकेकडून शहराच्या पूर्व भागाला पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी भामा-आसखेड योजना राबविली जात आहेत. या धरणातून २.६४ टीएमसी पाणी मिळणार आहे. या पाणीसाठ्यास मान्यता देताना जलसंपदा विभागाने पालिकेकडे जे पाणी महापालिकेस दिला जाईल, त्या पाण्यामुळे सुमारे १० हजार हेक्टर सिंचन क्षेत्र कमी होणार आहे. त्याची भरपाई म्हणून प्रति हेक्टर १ लाख ८४ हजार रुपयांची मागणी करण्यात आली आहे. 

Web Title: 162 crores fund for rehabilitation of Bhama-Askhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.