पुणे विभागातील १७ नायब तहसीलदारांना अखेर बढती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:08 AM2021-06-18T04:08:40+5:302021-06-18T04:08:40+5:30
पुणे : जवळपास वर्षभरापेक्षा अधिक काळ रखडलेली पुणे विभागातील नायब तहसीलदार संवर्गातील १७ जणांना बढती (प्रमोशन) देण्याचा निर्णय राज्य ...
पुणे : जवळपास वर्षभरापेक्षा अधिक काळ रखडलेली पुणे विभागातील नायब तहसीलदार संवर्गातील १७ जणांना बढती (प्रमोशन) देण्याचा निर्णय राज्य शासनाने बुधवारी रात्री उशिरा काढला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागातील नायब तहसीलदार डॉ. सुनील शेळके आणि बारामती तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांचाही या पदोन्नतीमध्ये समावेश आहे.
वस्तुतः एक वर्षभरापूर्वी या सर्वांची पदोन्नती होणे अपेक्षित होते. मात्र, राज्य शासनाने पदोन्नतीचा चार वेळा अध्यादेश (जी.आर) बदलला. तसेच तांत्रिक कारण आणि कोरोना महामारीचा या १७ जणांना मोठा फटका बसला आहे.
डॉ. सुनील शेळके, डॉ. धनंजय जाधव, बजरंग चौगुले, उदयसिंह गायकवाड, अंजली कुलकर्णी, रमेश पाटील, रवींद्र रांजणे, माधवी शिंदे, अनंता गुरव, रोहिणी शंकरदास, धनश्री शंकरदास, एस. आर. मागाडे, एन. एच. वाकसे, डी. के. यादव, पी. के. पवार, एस. आर. जाधव आणि एन. बी. गायकवाड आदी १७ जणांची तहसीलदार पदी पदोन्नती झाली आहे.
फोटो : १) डॉ. सुनील शेळके
२) डॉ. धनंजय जाधव