फटाक्यांनी लावल्या 17 अागी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 04:21 PM2018-11-10T16:21:58+5:302018-11-10T16:26:38+5:30

लक्ष्मीपूजन ते भाऊबीज या दिन दिवसांमध्ये फटाक्यांमुळे पुण्यातील विविध भागात 17 अागीच्या घटना घडल्या

17 fire incidents due to firecrackers | फटाक्यांनी लावल्या 17 अागी

फटाक्यांनी लावल्या 17 अागी

पुणे : दिवाळीत अाकाशात उडवले जाणारे फटाक्याचे बाण, शाेभेचे फटाके यांच्यामुळे दरवर्षी अागीच्या घटना घडत असतात. यंदा लक्ष्मीपूजन ते भाऊबीज या दिन दिवसांमध्ये फटाक्यांमुळे पुण्यातील विविध भागात 17 अागीच्या घटना घडल्या असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. यात कुठलिही जीवित हानी झाली नसली तरी फटाक्यांमुळे अागीच्या घटना वारंवार घडत असल्याचे पुन्हा एकदा समाेर अाले अाहे.
 
    यंदा सर्वाेच्च न्यायालयाने दिवाळीतफटाके उडविण्याच्या वेळेवर निर्बंध घातले हाेते. रात्री अाठ ते दहा या वेळेतच फटाके उडविण्यास परवानगी देण्यात अाली हाेती. तरीही सर्वाेच्च न्यायालयाचा निर्णय झुगारत पुण्यासह राज्यात रात्री उशीरापर्यंत फटाके फाेडण्यात अाले. फटाक्यांमुळे अागीच्या घटना घडत असल्याने फटाके उडविताना काळजी घेण्याचे तसेच अाकाशात उडवले जाणारे फटाके माेकळ्या मैदानात उडविण्याचे अावाहन अग्निशमन दलाकडून करण्यात येत असते. तरीही अनेक नागरीक हे अावाहन धुडकावून लावत असल्याचे चित्र अाहे. पुण्यात लक्ष्मीपूजनच्या दिवशी माेठ्याप्रमाणावर अाताषबाजी करण्यात अाली. लक्ष्मीपूजननंतर पुढील तीन दिवस शहरातील विविध भागात अाताषबाजी करण्यात अाली. या दिन दिवसांमध्ये फटाक्यांमुळे शहरातील विविध भागात 17 अागीच्या घटना घडल्या.
 
    दरम्यान यंदा दिवाळीत फटाक्यांबराेबरच इतर कारणांमुळे शहरात 36 अागीच्या घटना घडल्या असल्याचे समाेर अाले अाहे. त्यात लक्ष्मीपूजनच्या दिवशी साेळा ठिकाणी तर पाडवा अाणि भाऊबीजेच्या दिवशी वीस ठिकाणी अाग लागली हाेती. फटाक्यांमुळे झाडे, कचरा, सदनिका, घराचे छत, गवत, दुचाकी यांना अागी लागल्याचे समाेर अाले अाहे. 

Web Title: 17 fire incidents due to firecrackers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.