ओतूर परिसरात १७ पाॅझिटिव्ह रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:11 AM2021-04-03T04:11:10+5:302021-04-03T04:11:10+5:30
ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्र कक्षेत कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होतो आहे शुक्रवारीओतूर शहरात ११ ,धोलवड १ ,नेतवड माळवाडी ...
ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्र कक्षेत कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होतो आहे शुक्रवारीओतूर शहरात ११ ,धोलवड १ ,नेतवड माळवाडी २,डुंबरवाडी ,हिवरेखूर्द ,आलमे प्रत्येक गावात एक एक असे एकूण १७ पाॅझिटिव्ह रुग्ण सापडले, अशी माहिती ओतूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी सारोक्ते यांनी दिली.
शुक्रवारी परिसरात १७ रुग्ण सापडल्याने परिसराची एकूण बाधितांची संख्या १०८९ झाली आहे. ९४९ बरे झाले आहेत. ७० जण कोविड सेंटरमध्ये तर २१ घरीच उपचार घेत आहेत. ४९ जणांचा मृत्यू झाला आहे.
ओतूर शहरातील बाधितांची संख्या ५५८ झाली आहे ४७७ बरे झाले आहेत. ४६ जण कोविड सेंटर ११ जण घरीच उपचार घेत आहेत. २४ जणांचा मृत्यू झाला आहे.
धोलवड येथील ४२ बाधितांपैकी ३१ बरे झाले आहेत. ४ जण कोविड सेंटर तर १ घरीच उपचार घेत आहे. ४ जणांचा मृत्यू झाला आहे.
माळवाडी येथील बाधितांची संख्या २० झाली आहे. १७ बरे झाले आहेत. २ जण कोविड सेंटर तर एक घरीच उपचार घेत आहे. डुंबरवाडीतील बाधितांची संख्या ३२ झाली आहे पैकी २८ बरे झाले आहेत. २ जण कोविड सेंटर तर २ जण घरीच उपचार घेत आहे. हिवरे खुर्द येथील बाधितांची संंख्या ४० झाली आहे ३४ बरे झाले आहेत.