मराठा क्रांती मोर्चाच्या पुण्यातील १७ प्रमुख कार्यकर्त्यांची धरपकड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 01:17 PM2018-11-26T13:17:21+5:302018-11-26T13:40:15+5:30
मराठा क्रांती मोर्चाने सोमवारी विधानसभेवर आंदोलन करण्याचा निश्चय केला असून हे आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी जागोजागी मराठा क्रांती मोर्चाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची मध्यरात्रीपासून धरपकड सुरु केली आहे़.
पुणे : मराठा क्रांती मोर्चाने सोमवारी विधानसभेवर आंदोलन करण्याचा निश्चय केला असून हे आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी जागोजागी मराठा क्रांती मोर्चाच्या प्रमुख १७ कार्यकर्त्यांची मध्यरात्रीपासून धरपकड सुरु केली आहे़. पुण्यात प्रमुख कार्यकर्त्यांना रात्रीतून ताब्यात घेतले असून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या वाटेतच रोखण्यात येत आहे़. याप्रकरणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे, विकास पासलकर, धनंजय जाधव, तुषार काकडे, अमर पवार, संतोष शिंदे, प्रशांत धुमाळ, संगिता भालेराव, रघुनाथ चित्रे पाटील, प्रविण गायकवाड, पुजा झोळे, अमोल पवार , सुरेश शेडकर, युवराज दिसले, अरुण वाघमारे, कैलास पठारे, आबासाहेब पऱ्हाडे अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. याशिवाय काही जणांना समन्स देऊन सोडून देण्यात आले आहे़. पुणे तसेच पश्चिम महाराष्ट्रातून या आंदोलनासाठी जाणाऱ्या गाड्यांची तपासणी पुणे -मुंबई एक्सप्रेस वे वर करण्यात येत असून कार्यकर्त्यांच्या गाड्या वाटेत अडविण्यात येत आहे़. त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त महामार्गावर ठेवण्यात आला आहे़.