Accident: इंदापूरात लक्झरी बस आणि ट्राॅलीच्या धडकेत १७ वर्षीय मुलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 04:42 PM2021-11-19T16:42:51+5:302021-11-19T16:43:09+5:30
आदित्यराज विश्वास देवकाते असे अपघातात मृत्यू झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव असून कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक विश्वास देवकाते यांचा मुलगा आहे
बाभुळगाव : इंदापूर तालुक्यातील पुणे सोलापूर महामार्गावर उसाने भरलेल्या ट्रॉलीला बसने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. त्यामध्ये ट्रॉलीशेजारी उभे असलेले तिघे जखमी झाले आहेत. त्यांना इंदापूर उपजिल्हा रूग्णांलयात दाखल केले असता त्यापैकी एका अल्पवयीन मुलाचा मृत्यूची झाल्याची माहिती इंदापूर पोलिसांनी दिली आहे.
आदित्यराज विश्वास देवकाते(वय १७) असे अपघातातमृत्यू झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव असून कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक विश्वास देवकाते यांचा तो मुलगा आहे. या अपघातात आदित्यराजचे वडील विश्वास रंगनाथ देवकाते (रा.देवकाते वस्ती मदनवाडी, ता.इंदापूर) व संतोष अंकुश पवार (रा.पोंधवडी, ता.इंदापूर) अशी जखमींची नांवे आहेत. याबाबत राजेंद्र सर्जेराव देवकाते(वय३८ रा.मदनवाडी,ता.इंदापूर) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गुरूवारी रात्री उसाने भरलेल्या दोन ट्राॅलीसह पुणे सोलापूर हायवे रोडवरून सोलापूरकडे जात होता. गागरगाव जवळ ट्रॉलीचे मागचे टायर पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला हे तिघे ट्राॅलीचे चाक बदलत होते. त्यावेळी पाठीमागून येणार्या लक्झरी बसने चालकाचा ताबा सुटल्याने ती ट्राॅलीला जोरात धडकली.
घटना समजताच पोलीस मदत केंद्राचे सहायक फौजदार भागवत शिंदे, पोलीस हवालदार उमेश लोणकर व पोलीस नाईक नितीन जगताप तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना खासगी वाहनाने इंदापूर उपजिल्हा रूग्णालयात उपचारसाठी पाठवण्यात आले. उपचार घेत असताना आदित्यराज विश्वास देवकाते याचा मृत्यू झाला. आदित्यराजच्या मृत्युने मदनवाडी गावावर शोककळा पसरली असून नागरीकातून हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहे.