अनैतिक संबंधातून १७ वर्षांच्या मुलीने दिला मुलाला जन्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:10 AM2021-09-26T04:10:33+5:302021-09-26T04:10:33+5:30
पुणे : एक वर्षापासून सुरू असलेल्या अनैतिक संबंधातून एका १७ वर्षांच्या मुलीने मुलाला जन्म दिला असून, सिंहगड रोड पोलिसांनी ...
पुणे : एक वर्षापासून सुरू असलेल्या अनैतिक संबंधातून एका १७ वर्षांच्या मुलीने मुलाला जन्म दिला असून, सिंहगड रोड पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.
अनिरुद्ध समाधान आगलावे (वय २०, रा. वडगाव बुद्रुक) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांची १७ वर्षांची मुलगी आणि आरोपी यांचे एक वर्षापासून प्रेमसंबंध होते. आरोपीने मुलीच्या इच्छेविराेधात तिच्यासोबत बळजबरीने शरीरसंबंध केले. त्यातून मुलगी गरोदर राहिली होती. तिने नुकताच बाळाला जन्म दिला. त्यानंतर फिर्यादी यांनी डॉक्टरांकडे जाऊन माहिती घेतली. मुलीला विश्वासात घेऊन चर्चा केल्यानंतर फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ३७६ सह पोस्को ॲक्टखाली गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.