बाजार समितीला १.७५ कोटीचा दंड

By admin | Published: February 15, 2017 02:45 AM2017-02-15T02:45:04+5:302017-02-15T02:45:04+5:30

बेकायदा उत्खननप्रकरणी पुणे बाजार समितीला जिल्हा प्रशासनाने पावणदोन कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. गुलटेकडी

1.75 crores penalty for market committee | बाजार समितीला १.७५ कोटीचा दंड

बाजार समितीला १.७५ कोटीचा दंड

Next

पुणे : बेकायदा उत्खननप्रकरणी पुणे बाजार समितीला जिल्हा प्रशासनाने पावणदोन कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
गुलटेकडी मार्केट यार्ड येथील बाजार समितीच्या आवारामध्ये अत्याधुनिक फूल बाजार उभारण्यासाठी सर्व्हे नंबर ५६०मध्ये सुमारे ५ हेक्टर ७० आर क्षेत्रात बेकायदा उत्खनन करण्यात आले आहे. तसेच या उत्खननामधून निघालेला मुरुम दुसऱ्या सर्व्हे नंबरमध्ये वापरण्यात आला. यासाठी बाजार समितीने परवानगी न घेतल्याने जिल्हा प्रशासनाने तब्बल १ कोटी ६९ लाख ५९ हजार रुपयांचा दंड केला आहे. बाजार समितीच्या वतीने फूल बाजाराच्या उभारणीसाठी ६ हजार २३४ ब्रास मुरुम उत्खनन करण्याची परवानगी घेतील होती. प्रत्यक्ष तब्बल ९ हजार ३९६ उत्खनन करण्यात आले.

Web Title: 1.75 crores penalty for market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.