Indian Railway | पुणे-गोरखपूर दरम्यान १८ अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे
By नितीश गोवंडे | Published: April 20, 2023 05:11 PM2023-04-20T17:11:44+5:302023-04-20T17:12:35+5:30
मध्य रेल्वेने पुणे ते गोरखपूर दरम्यान विशेष शुल्कासह विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला...
पुणे : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पुणे ते गोरखपूर दरम्यान विशेष शुल्कासह विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे नं. ०१४३१ ही विशेष रेल्वे पुणे येथून २१ एप्रिल ते १६ जून दरम्यान दर शुक्रवारी संध्याकाळी सव्वा चरच्या सुमारास सुटेल आणि गोरखपूर येथे दुसऱ्या दिवशी रात्री नऊच्या सुमारास पोहोचेल. तर रेल्वे नं. ०१४३२ विशेष रेल्वे गोरखपूर येथून २२ एप्रिल ते १७ जून दरम्यान दर शनिवारी रात्री अकरा वाजून २५ मिनिटांनी सुटेल आणि पुणे येथे तिसऱ्या दिवशी सकाळी सव्वा सातच्या सुमारास पोहोचेल.
ही उन्हाळी विशेष रेल्वे दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा जंक्शन, इटारसी, भोपाळ, बिना, विरांगना लक्ष्मीबाई जंक्शन, उरई, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा, मानकापूर, बस्ती आणि खलीलाबाद या रेल्वे स्थानकावर थांबेल.
२० एप्रिलपासून या विशेष रेल्वेच्या तिकीट बुकिंगसाठी सुरुवात झाली असून, प्रवासी www.irctc.co.in या वेबसाइटवरून देखील ऑनलाईन तिकीट काढू शकतात, अशी माहिती पुणे रेल्वे विभागातर्फे देण्यात आली.