भामा-भीमा नद्यांवरील १८ बंधारे भरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 12:20 AM2018-04-12T00:20:26+5:302018-04-12T00:20:26+5:30
आंदोलकांचा विरोध झुगारून अखेर भामा-आसखेड धरणातून नदीपात्रात ७५० क्युसेक्स पाणी सोडण्यात येणार असून, त्यातून भामा नदीवरील ८, तर भीमा नदीवरील १० असे एकूण १८ बंधारे भरले जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
आसखेड : आंदोलकांचा विरोध झुगारून अखेर भामा-आसखेड धरणातून नदीपात्रात ७५० क्युसेक्स पाणी सोडण्यात येणार असून, त्यातून भामा नदीवरील ८, तर भीमा नदीवरील १० असे एकूण १८ बंधारे भरले जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सोमवारी (दि. ९) सकाळी पावणेअकराच्या सुमारास धरणाच्या ‘आयसीपीओ’मधून नदीपात्रात ७५० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. दरम्यान, २४ तास सुमारे १५ दिवस पोलीस बंदोबस्त राहणार असल्याचे चाकणचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी सांगितले.
उन्हाळी आवर्तन सोडण्यास प्रकल्पग्रस्तांच्या विरोधामुळे उशीर झाला होता; परंतु सध्या भामा नदीपात्रात पाणी सोडल्याने खेड तालुक्याच्या पूर्व भागासह शिरूर व दौंड या तालुक्यांतील नागरिकांनी व शेतकºयांनीही समाधान व्यक्त केले आहे.
भामा आणि भीमा नदीपात्रांत पाण्याचा खडखडाट व बंधाºयांतील पाणी संपत आल्याने नदीकाठच्या शेतकºयांची बागायती शेती अडचणीत येऊ लागली होती. याशिवाय, काही ठिकाणी पिके जळण्याच्या मार्गावर होती. २९ मार्च रोजी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या निर्णयानुसार १ एप्रिल रोजी पाणी सोडण्यात येणार होते; परंतु आंदोलकांनी अधिकाºयांना निवेदन देऊन ते थांबविले. त्यानंतर ५ एप्रिल रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास भामा-आसखेड धरणातून प्रशासनाने पाणी सोडले. परंतु, आंदोलक त्यांच्या निर्णयावर ठाम होते; त्यामुळे चाहूल लागताच दुसºयाच दिवशी (दि. ६) हजारो प्रकल्पग्रस्त नागरिक करंजविहीरे येथे जमा झाले व त्यांनी धरण विभागाचे उपविभागीय अधिकारी सर्जेराव मेमाणे यांना निवेदन देऊन पाणी बंद करण्यास भाग पाडले. तत्कालीन परिस्थिती पाहून मेमाणे यांनी पाणी बंद करण्याच्या सूचना दिल्या; परंतु त्यानंतर दुसºयाच दिवशी सायंकाळी मेमाणे यांनी चाकण पोलीस ठाण्यात आंदोलकांविरुद्ध तक्रार दिली आणि पोलिसांनी १९ आंदोलकांसह अन्य ८० ते १०० जणांवर गुन्हा दाखल केला.
सुमारे १३ ते १५ दिवस आवर्तन सुरू राहणार असून, त्यासाठी उपविभागीय अधिकारी राम पठारे, तहसीलदार सुनील जोशी, चाकणचे पोलीस निरीक्षक मनोज यादव, सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, भामा-आसखेड धरण उपविभागाचे उपविभागीय अधिकारी सर्जेराव मेमाणे, भारत बेंद्रे, के. डी. पांडे, नरेंद्र धेंडे यांच्या निरीक्षणाखाली आवर्तन सुरू राहणार आहे.
बंदोबस्त : सुमारे ८ ते १० पोलिसांचा ताफा दररोज धरणावर राहणार असून, त्यात एका पोलीस अधिकाºयाचाही समावेश असेल. चाकणचे पोलीस निरीक्षक मनोज यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विलास गोसावी, पो.हा. संजय जाधव, पो.ना.
संदीप रसाळ व सतीश जाधव, होमगार्ड आतिष शिंदे व मारुती केदारी यांचा ताफा सध्या तैनात आहे. आवर्तन बंद करेपर्यंत बंदोबस्त राहणार असल्याचे
यादव यांनी सांगितले.