ससून हॉस्पिटलच्या आवारातच रंगला पत्त्यांचा डाव, गुन्हे शाखेच्या कारवाईत 18 जुगारी ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2022 07:30 PM2022-04-02T19:30:31+5:302022-04-02T19:31:06+5:30
बंडगार्डन पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल
पुणे : पुण्यातील ससून हॉस्पिटलच्या सर्व्हन्ट कॉटर्सच्या आवारात दिवसाढवळ्या अंदर-बाहर जुगार खेळणाऱ्या अन्वर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. त्या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या 18 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर दोन ते तीन जण पोलिसांना पाहून पाहून गेले. बंडगार्डन पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल रामनरेश गुप्ता (वय 27), किशोर मंजुनाथ तलवार (वय 40), आनंद हनुमंतराव मराठे (वय 27), राहुल काशिनाथ हजारे (वय 27) जावेद चांदखान पठाण (वय 41), राकेश गोपाल राठोड, शुभम हरिश्चंद्र तळेकर, सचिन सूर्यकांत गुरव, सलमान हुसेन खान, सिध्दप्पा यलप्पा मुळगुंद, अमित मारुती पुजारी, उमेश गोरख सावंत, रफिक अब्दुल शेख, अजय रघुनाथ पवार हनुमंत धोंडीबा मोरे अक्षय नारायण पाटील संतोष गुरुलिंग शेट्टी आणि शाबीत हसन शेख अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस नाईक अश्विनी केकान यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, ससून हॉस्पिटलच्या सर्व्हन्ट कॉटर्सच्या आवारात काही व्यक्ती जुगार खेळत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी त्यांना या ठिकाणी जुगार सुरू असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी या ठिकाणाहून अंदर बाहर हा पत्त्याचा जुगार खेळणाऱ्या 18 जणांना ताब्यात घेते. त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम आणि अठरा मोबाईल असा एकूण एक लाख 48 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जुगार खेळणाऱ्या सर्व विरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम 12 अ, 4 अ, 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.