भोरमधील १८ ग्रामपंचायती बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 06:24 AM2017-10-05T06:24:34+5:302017-10-05T06:25:01+5:30

तालुक्यातील १५५ पैकी ५४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी १५८ उमेदवारी अर्ज, तर ५४ ग्रामपंचायतींच्या ३६२ सदस्यपदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ४५४ जणांनी अर्ज दाखल केले

18 gram panchayats unanimously elected | भोरमधील १८ ग्रामपंचायती बिनविरोध

भोरमधील १८ ग्रामपंचायती बिनविरोध

Next

भोर : तालुक्यातील १५५ पैकी ५४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी १५८ उमेदवारी अर्ज, तर ५४ ग्रामपंचायतींच्या ३६२ सदस्यपदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ४५४ जणांनी अर्ज दाखल केले. ५४ पैकी १८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून वाढाणे व सोनवडी या दोन ग्रामपंचायतींचे सरपंचपद रिक्त राहिले आहे. ५ आॅक्टोबर रोजी माघारीनंतर चित्र स्पष्ट होईल.
नोव्हेबर व डिसेंबर २०१७मध्ये मुदत संपणाºया तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १६ आॅक्टोबरला होत आहेत. सरपंचपदाची २०२०पर्यंतची आरक्षणाची सोडत २०१५मध्येच काढण्यात आली आहे. तालुक्यातील १५५ पैकी ५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. इच्छुकांनी सर्व कागदपत्रे गोळा करून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हसर बुद्रुक, म्हसर खुर्द, शिरवलीतर्फे भोर, आपटी, हरिश्चंद्री, कोळवाडी, सांगवी खुर्द, करंदी बुद्रुक, आंबेघर दुर्गाडी, गुढे मळे, भुतोंडे, कोर्ले, बसरापूर, करंदी खुर्द, वाढाणे सोनवडी या १८ गावांच्या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. पहिल्यांदाच थेट जनतेतून सरपंचाची निवड होणार असल्याने तालुक्यातील अनेक नेत्यांच्या गावांचा समावेश असून त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामुळे तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या वेळी संपूर्ण गावाने मतदान करायचे असल्याने ही निवडणूक सर्वासाठी अत्यंत चुरशीची ठरणार असून अनेक राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. भोर तालुक्यातील प्रत्येक गावातील राजकीय नेते आपली ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील असून तशा हालचाली सुरू झाल्या आहेत.

Web Title: 18 gram panchayats unanimously elected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.