भाजपा आमदार माधुरी मिसाळ यांच्या वानवडी येथील बंगल्यातून १८ लाखांचे दागिने चोरीला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 03:55 PM2020-12-12T15:55:36+5:302020-12-12T16:13:18+5:30

या्प्रकरणी वानवडी पोलिसांनी महिला कामगारांवर संशय व्यक्त

18 lakh jewellery stolen from MLA Madhuri Misal's bungalow of wanavdi | भाजपा आमदार माधुरी मिसाळ यांच्या वानवडी येथील बंगल्यातून १८ लाखांचे दागिने चोरीला

भाजपा आमदार माधुरी मिसाळ यांच्या वानवडी येथील बंगल्यातून १८ लाखांचे दागिने चोरीला

googlenewsNext

पुणे : भाजपा आमदारमाधुरी मिसाळ यांच्या वानवडी येथील फेअर रोडवरील बंगल्यातून १८ लाख रुपयांचे हिरे व सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. या्प्रकरणी वानवडी पोलिसांनी महिला कामगारांवर संशय व्यक्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी ममता दीपक मिसाळ (वय ५१, रा. फेअर रोड, वानवडी) यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की, आमदारमाधुरी मिसाळ व आम्ही सर्व जण एकत्र राहतो. बंगल्यामध्ये काम करण्यासाठी आम्ही नोकर ठेवलेले असून त्यापैकी बंगल्यामधील साफसफाई, धुणीभांडी व इतर काम करण्यासाठी ७ महिला नोकर आहेत. त्यांच्यापैकी बंगल्यामध्ये असणारे सर्व बेडरुमची साफसफाई करण्यासाठी ठेवलेल्या नोकरी महिला या काम करण्यासाठी बेडरुममध्ये येत असतात. २८ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता माझ्या बेडरुममध्ये ठेवलेले सोन्याचे दागिन्यांपैकी एक हिरे, मोतीची डिझाईन असलेला एक सोन्याचा हार व सोन्याचे हिरे माेतीची डिझाईन असलेला कडा तिजोरीत ठेवलेला बॉक्स मिळून आला नाही. हा प्रकार त्यांनी पती दीपक यांना सांगितला. त्यानंतर माधुरी मिसाळ यांनाही सांगितले. सर्वांनी सोन्याचे दागिने ठेवलेला बॉक्स शोधला. परंतु, तो मिळून आला नाही. १८ ते २८ नोव्हेंबर या दरम्यान १४ लाख रुपयांचा हिऱ्यांचा हार आणि ४ लाख रुपयांचा हिरे मोती असलेला हार असा १८ लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला असल्याची फिर्याद देण्यात आली आहे.

याबाबत वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी सांगितले की, सोन्याचे दागिने ठेवलेला बॉक्स एक तर घरातच गहाळ झाला असावा अथवा घरात काम करणाऱ्या महिला कामगारांपैकी कोणीतरी चोरला असण्याची शक्यता आहे. बाहेरुन कोणी येऊन चोरी करुन गेला नसल्याचा आतापर्यंतच्या तपासात दिसून आले. महिला कामगारांकडे चौकशी करण्यात येत आहे.

Web Title: 18 lakh jewellery stolen from MLA Madhuri Misal's bungalow of wanavdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.