१८०० शाळा तंबाखूमुक्त!, व्यसनमुक्तीसाठी पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 01:13 AM2019-03-04T01:13:22+5:302019-03-04T01:13:29+5:30

व्यक्तिमत्त्व विकासात शारीरिक आरोग्य अत्यंत महत्वाचे आहे.

1800 School Free, Non-Tobacco Initiatives! | १८०० शाळा तंबाखूमुक्त!, व्यसनमुक्तीसाठी पुढाकार

१८०० शाळा तंबाखूमुक्त!, व्यसनमुक्तीसाठी पुढाकार

Next

कान्हूरमेसाई : व्यक्तिमत्त्व विकासात शारीरिक आरोग्य अत्यंत महत्वाचे आहे. आपल्या शरीरातील विविध इंद्रिय संस्था सुरळीतपणे कार्य करतात तेव्हाच आपले आरोग्य चांगले आहे, असे आपण म्हणतो. परंतु, धुम्रपान, तंबाखूसेवन व मद्यपान यांसारख्या घातक सवयी आरोग्यास बिघडवतात. शाळेत जाणाऱ्या १५ टक्के कुमारवयीन मुलांना तंबाखूचे व्यसन असल्याचे वास्तव पुढे आल्याने आता शाळाच तंबाखूमुक्त करण्याचा उपक्रम शासनाकडून राबविला जात आहे. पुणे जिल्ह्यातील १९०० शाळांपैकी १८०० शाळांनी आपली शाळा तंबाखूमुक्त करण्याचा ध्यास धरला असून अनुदानित ९०० शाळा, विनाअनुदानित ५०० शाळा व इतर ४०० शाळा तंबाखूमुक्त झाल्या असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपतराव मोरे यांनी सांगितले.
दरवर्षी जगात जवळजवळ ६४ लाख लोक तंबाखूमुळे मरतात. सण २०३० पर्यंत जगात तंबाखूमुळे मरणाऱ्यांची संख्या वर्षाकाठी ८० लाख होणार आहे. भारतात दररोज २ हजार ५०० लोकांचा तंबाखूने मृत्यू होतो. वर्षाकाठी १० लाखांहून अधिक लोक तंबाखूमुळे एकट्या भारतात मरण पावतात. तंबाखूमुळे होणाºया तोंडाचा कर्करोगाचे सर्वाधिक रुग्ण भारतात आहेत. इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च आॅन कॅन्सर आणि जागतिक आरोग्य संघटनेनुसार धुम्रपानात ४ हजारांहून अधिक रसायने असल्याचे सांगण्यात आले. धुम्रपानात ८० आणि धुम्ररहीत तंबाखू पदार्थांत २८ कर्कजन्य रसायने असतात. कोणताही प्राणी तंबाखूची पाने खात नाही. तरीही सर्वांत सुज्ञ समजला जाणारा मनुष्य तंबाखूचे सेवन करून स्वत:चेच जीवन नरकमय बनवीत आहे. या तंबाखूच्या व्यसनापासून उद्याची पिढी म्हणजे किशोरवयीन मुले व शिक्षकांना दूर ठेवण्यासाठी शासनाने शाळेत आता तंबाखूमुक्त शाळा अभियान राबविणे सुरू केले आहे. या अभियानाला यशस्वी करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील संपूर्ण शिक्षण विभाग कामाला लागला आहे. पुणे जिल्ह्यातील १९०० शाळा तंबाखूमुक्त करण्याचा मानस शिक्षण विभागाचा आहे. या तंबाखूमुक्त शाळांसाठी ११ निकष ठेवले आहेत. त्या निकषांची पूर्तता करून त्याची माहिती अ‍ॅपवर अपलोड करून आपल्या शाळेला तंबाखूमुक्त शाळा घोषित करण्याच्या स्पर्धेत १८०० उतरल्या असल्याचे डॉ. मोरे यांनी सांगितले. तंबाखूमुळे होणारे दुष्परिणाम सेवनामुळे केस व तोंडाची दुर्गंधी येते, दात सडतात, हिरड्यांना इजा होऊन दात निकामी होऊन त्याची मजबुती नष्ट होते, चॉकलेटी, पिवळे दात पडतात, वास घेण्याची क्षमता कमी होते, चेहºयावर सुरकत्या पडतात, शरीरात अशक्तपणा जाणवतो, हाडे ठिसुळ होतात व रोगप्रतिकारकशक्ती कमी होऊ लागते, डोळ्यांमध्ये जळजळ होऊन पाणी येते, निकोटीनच्या प्रभावामुळे मेंदूच्या कार्यावर विपरीत परिणाम होतो, विचार करण्याची क्षमता कमी होते, चित्त एकाग्र करणे कठीण जाते. तंबाखूमुळे तोंड, स्वरयंत्र, फुप्फुस, गळा, अन्ननलिका, मूत्राशय, मूत्रपिंड, नाक, पोट, महिलांमध्ये गर्भाशय व मुखाचा कॅन्सर होतो. गँगरीन, क्षयरोग, दमा, हृदयविकार, उच्च रक्तदाब, लकवा, मधुमेह व मोतीबिंदू होतो. पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होत जाते व पुरुष नपुंसक बनतो. ज्या महिला तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात त्यांची प्रजननक्षमता कमी होते व त्यांना वंधत्व येते.
>तंबाखू सोडण्यासाठी हे करा...
तंबाखू सोडण्याचा विचार करणाºया व्यक्तींनी तंबाखू सोडण्याच्या तारखेची घोषणा आपल्या कुटुंबीयांसमोर, नातलगांसमोर किंवा मित्रासमोर करावी. तंबाखूसाठी प्रवृत्त करतील, अशा लोकांपासून दूर राहावे. तंबाखू सेवनाची इच्छा झाल्यास १ ते १०० अंक मोजावे, दोरीवरील उड्या व प्राणायाम करावा. कुरमुरे, चणे, शेंगदाणे, बडीशेप या पदार्थांचे सेवन करावे, तंबाखू सेवनाने शरीरात असणारी विषारी रसायने शरीरातून बाहेर टाकण्यासाठी जास्तीत जास्त पाणी घ्यावे, योग्य मित्रांसोबत आपले विचार व भावना
शेअर कराव्यात.

Web Title: 1800 School Free, Non-Tobacco Initiatives!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.