पुरंदर तालुक्यात १८३ कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:19 AM2021-05-05T04:19:28+5:302021-05-05T04:19:28+5:30

आज सलग चौथ्यादिवशी ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र आहे. सासवड येथील ग्रामीण रुग्णालयातील शासकीय लॅबमध्ये ३४२ संशयित रुग्णांची ...

183 corona affected in Purandar taluka | पुरंदर तालुक्यात १८३ कोरोनाबाधित

पुरंदर तालुक्यात १८३ कोरोनाबाधित

Next

आज सलग चौथ्यादिवशी ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र आहे.

सासवड येथील ग्रामीण रुग्णालयातील शासकीय लॅबमध्ये ३४२ संशयित रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी ११६ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत. सासवड शहरामधील ५२, तर ग्रामीण भागातील ६४ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले. सासवड ५२, पिसर्वे १४, केतकावळे ५, शिवरी ४, पिंपळे, यादववाडी, परिंचे, पारगाव, वाघापूर, हिवरे, काळेवाडी, झेंडेवाडी, चांबळी, दिवे येथील प्रत्येकी २, राजेवाडी, गुरूळी बेलसर, जेजुरी, काळदरी, भिवरी, टेकवडी, आस्करवाडी, सोनोरी, भिवडी, कोडीत, सुपा, आंबळे, माळशिरस, रिसे, पोढें, पानवडी, वीर, एखतपूर, पठारवाडी, मुंजवडी येथील प्रत्येकी १ असे एकूण ११६ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत.

जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयातील शासकीय लॅबमध्ये १५० संशयित रुग्णांची कोरोना चाचणी तपासण्यात आली. यापैकी ६९ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले. जेजुरी शहर १५, तर ग्रामीण भागातील ४६ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले. नाझरे, पिसर्वे ६, पिंपरे खुर्द ५, वाल्हे, निळूंज, पिंपरी प्रत्येकी ४, भोरवाडी ३, जेऊर, सुपे २,भोसलेवाडी, गुळूंचे, मावडी, रानमळा, धालेवाडी, नीरा, कर्नलवाडी, मांडकी, पिसुर्टी येथील प्रत्येकी १, तालुक्याबाहेरील मुर्टी ३, मोराळवाडी २, मोराळे १ असे एकूण ६९ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत.

-

Web Title: 183 corona affected in Purandar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.