जुन्नर तालुक्यात आढळले १८९ कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:10 AM2021-04-17T04:10:22+5:302021-04-17T04:10:22+5:30

जुन्नर तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून आजपर्यंत जुन्नर तालुक्यात ९ हजार ३११ कोरोना रुग्ण आढळले आहेत. यापैकी ...

189 corona-affected found in Junnar taluka | जुन्नर तालुक्यात आढळले १८९ कोरोनाबाधित

जुन्नर तालुक्यात आढळले १८९ कोरोनाबाधित

Next

जुन्नर तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून आजपर्यंत जुन्नर तालुक्यात ९ हजार ३११ कोरोना रुग्ण आढळले आहेत. यापैकी ७ हजार ६५५ रुग्ण बरे झालेले असून १ हजार ३६९ रुग्ण सक्रिय आहेत. तर २८७ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. १५ एप्रिलला तीन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला असून यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. जुन्नर तालुक्याचा मृत्युचा दर ३.०८ टक्के इतका आहे. १५ एप्रिलच्या अहवालानुसार जुन्नर तालुक्यातील एकूण ५५ गावांमध्ये कोरोना रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने नारायणगाव - २३, वारूळवाडी – ८, आळे – १४, ओतूर – २१, जुन्नर शहर- १४ व बादशहा तलाव – ४, सावरगाव – ७, बोरी बुद्रुक, गोळेगाव येथे प्रत्येकी -६, खोडद, निमगाव सावा, पिंपरी पेंढार प्रत्येकी ५ असे कोरोना रुग्ण आढळून आलेले आहेत. येणेरे, गुंजाळवाडी, आर्वी, नेतवड, उदापूर, ठिकेकरवाडी, साकोरी, बारव, येडगाव या गावांमध्ये प्रत्येकी ३ रुग्ण कोरोना पाॅझिटिव्ह मिळून आले आहेत. नागरिकांनी गर्दी करू नये. मास्कचा वापर करावा. अतिमहत्त्वाचे काम असेल तरच बाहेर पडावे शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन वारूळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी केले आहे.

Web Title: 189 corona-affected found in Junnar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.