Maharashtra | स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील १८९ कैद्यांची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 09:15 PM2023-01-27T21:15:51+5:302023-01-27T21:20:01+5:30
राज्यातील कारागृहातील १८९ कैद्यांची सुटका करण्यात आली...
पुणे : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त् भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालयामार्फत घालून देण्यात आलेल्या निकषाची पुर्तता केलेल्या राज्यातील कारागृहातील १८९ कैद्यांची सुटका करण्यात आली आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयामार्फत विशिष्ट प्रवर्गाच्या कारागृहातील शिक्षा झालेल्या चांगल्या वर्तणुकीच्या व निकषानुसार पात्र बंद्यांना विशेष माफी देणे बाबत निकष ठरविण्यात आले होते. त्यानुसार अमरावती मध्यवर्ती कारागृहातील १२, औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह ११, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह ७, मुंबई मध्यवर्ती कारागृह ४, नागपूर मध्यवर्ती कारागृह ३५, नाशिक मध्यवर्ती कारागृह ३५, तळोजा मध्यवर्ती कारागृह १६, ठाणे मध्यवर्ती कारागृह ११, येरवडा मध्यवर्ती कारागृह २०, अकोला जिल्हा कारागृहातील ३, भंडारा ३, चंद्रपूर २, कोल्हापूर २ सिंधुदूर्ग ४, वर्धा २, वाशिम १, यवतमाळ जिल्हा कारागृहातील १, औरगांबाद खुल्या कारागृहातील १३, पैठण खुले कारागृह ४, येरवडा खुले कारागृह १, येरवडा महिला कारागृतील २ असे एकूण १८९ कैद्यांची सुटका करण्यात आली असल्याची माहिती कारागृह प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.