पुणे विभागात १९ लाख कोरोनाबाधित झाले बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:12 AM2021-09-27T04:12:30+5:302021-09-27T04:12:30+5:30
पुणे : पुणे विभागातील १९ लाख ३३ हजार ४४ कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. विभागात बाधित रुग्णांची संख्या ...
पुणे : पुणे विभागातील १९ लाख ३३ हजार ४४ कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. विभागात बाधित रुग्णांची संख्या १९ लाख ८७ हजार २२४ झाली आहे, तर सक्रिय रुग्ण संख्या १२ हजार ७५३ इतकी आहे. कोरोनाबाधित एकूण ४१ हजार ३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण २.०६ टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९७.२९ टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा : पुणे जिल्ह्यातील बाधित एकूण ११ लाख ३५ हजार ६३४ रुग्णांपैकी ११ लाख १० हजार १११ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सक्रिय रुग्ण ६ हजार ७४१ आहेत. बाधित एकूण १८ हजार ७८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण १.६५ टक्के इतके आहे, तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९७.७५ टक्के आहे.
सातारा जिल्हा : सातारा जिल्ह्यातील बाधित एकूण २ लाख ४७ हजार ४६८ रुग्णांपैकी २ लाख ३७ हजार ९५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सक्रिय रुग्ण संख्या ३ हजार २५८ आहे. बाधित एकूण ६ हजार २५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा : सोलापूर जिल्ह्यातील बाधित एकूण २ लाख ३९० रुग्णांपैकी १ लाख ९४ हजार १८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सक्रिय रुग्ण संख्या १ हजार ४१३ आहे. ४ हजार ९५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा : सांगली जिल्ह्यातील बाधित एकूण १ लाख ९७ हजार ७५७ रुग्णांपैकी १ लाख ९१ हजार ६५७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सक्रिय रुग्ण संख्या ८४० आहे. बाधित एकूण ५ हजार २६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा : कोल्हापूर जिल्ह्यातील बाधित एकूण २ लाख ५ हजार ९७५ रुग्णांपैकी १ लाख ९९ हजार ७०२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सक्रिय रुग्ण संख्या ५०१ आहे. बाधित एकूण ५ हजार ७७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.